आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Pathankot : सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला रोष, मोदींवर निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संतप्त झालेल्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रोषाला वाट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेही लोकांनी चुकीचे ठरविले आहे. #Pathankot हॅशटॅगने लोक कॉमेंट करत आहेत.

मोदींना नवाज शरीफांचे न्यू इअर गिफ्ट
- निखिल विनॉय यांनी लिहिले, 'मोदीजी आणखी जा, तुमचा पाकिस्तानचा मित्र नवाज शरीफने तुमच्यासाठी न्यू इअर निमीत्ताने रिटर्न गिफ्ट पाठविले आहे.'

- अरुण मैसूर यांनी लिहिले, 'हा दाऊदच्या बर्थ-डेवेळी झालेल्या मोदी-शरीफ भेटीचा परिणाम आहे.'
- एका ट्विटमध्ये मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे, 'दहशतवाद्यांच्या लग्नाला गेल्यानंतर रिटर्न गिफ्टी शिवाय मोदींना परत कसे पाठवतील, कारगिल विसरता येईल का.'

- आणखी एका ट्विटमध्ये काश्मीर मुद्द्यावर म्हटले आहे, 'जोपर्यंत काश्मीरवर चर्चा होत नाही, तोपर्यंत असे हल्ले होत राहाणार.'

- एका ट्विटमध्ये म्हटले आहे, 'मोदींनी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्याने काहीही साध्य झाले नाही. हा त्याचा पूरावा आहे.'