आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेप्सी, कोकाकोला, स्प्राईट, 7अपमध्ये विषारी घटक; आरोग्यावर होतो विपरित परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पेप्सी, कोकाकोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन अपमध्ये जड धातू, जस्त, कॅडियम आणि क्रोमियम आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी राज्यसभेला दिली. विषारी घटकांचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. याच कारणावरुन नेस्ले मॅगीवरही बंदी घालण्यात आली होती.
राज्यसभेच्या एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फग्गनसिंह कुलस्ते म्हणाले, की ड्रग टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डाने (डीटीएबी) वरील पाच शितपेयांचे नमुने बाजारपेठेतून घेतले होते. त्यानंतर कोलकत्याच्या नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये हे नमुने पाठविण्यात आले. या शितपेयांमध्ये विषारी पदार्थ असल्याचे या तपासण्यांमध्ये आढळून आले.
पेप्सी, सेव्हन अप आणि माऊंटन ड्यू हे पेप्सिको कंपनीचे प्रोडक्ट आहेत. स्प्राईट आणि कोला हे कोको कोला कंपनीचे प्रोडक्ट आहेत. यांच्यावर बंदी घालण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर विषारी द्रव्यांचा अहवाल आला असल्याने यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता गृहित धरण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... आरोग्याला पोषक आहेत हे शितपेय.... यांचा वापर केल्यास आरोग्य राहिल उत्तम....
बातम्या आणखी आहेत...