आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी २०० किमी वेगाने धावणा-या रेल्वेची निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारने उपनगरीय तसेच शहरांतर्गत प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी देशी बनावटीच्या कोचचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ताशी २०० किमी वेगाने गाड्या लवकरच धावताना दिसून येतील. आगामी रेल्वे बजेटमध्ये (२०१५-१६) एसी रेक्स गाड्या सेवेसाठी तरतूद अपेक्षित आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात चेन्नईतील कारखान्यात २० कोचेस तयार करण्यात येणार आहेत. त्यांचा वेग ताशी २०० किमी असेल, असे सूत्रांनी सांगितले. सध्याचा रेल्वेचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर एवढा आहे.

१०० गाड्या येणार मोहिमेत
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेमध्ये देशातील आणखी १०० हून अधिक रेल्वेंना आणण्याची योजना बजेटमध्ये मांडली जाऊ शकते. त्याशिवाय देशातील सहा स्थानकांना स्वच्छ स्थानक योजनेत समाविष्ट केले जाईल. रेल्वेत बायोटॉयलेट्सची सुविधा आणली जाणार आहे.

एनआयडीची स्थापना
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) संस्थेच्या स्थापनेची घोषणाही होऊ शकते. संस्थेच्या माध्यमातून रेल्वे गाड्यांचे डिझाइन, अंतर्गत रचना निश्चित केली जाईल.

'२६'कडे लक्ष
२६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प सादर होईल. जागतिक दर्जाची उत्पादन क्षमता विकसित करणे, मनुष्यबळाच्या कमी वापरावर भर दिला जाईल.