आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी शंभरावर चकमकी बनावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इशरत जहां तसेच लाखन भैया बनावट चकमकींचे प्रकरण सध्या गाजत आहे. बनावट चकमकींच्या प्रकरणात गुजरात भलेही चर्चेत असेल, परंतु प्रत्यक्षात त्यात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला प्राप्त होणार्‍या बनावट चकमकींच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.आयोगास दरवर्षी 100 पेक्षा जास्त बनावट चकमकींच्या तक्रारी प्राप्त होतात. गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशातून आयोगास बनावट चकमकींच्या 138 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

पोलिस तसेच लष्करासोबत झालेल्या चकमकींच्या तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला अशा स्वरूपाच्या दरवर्षी सरासरी शंभर तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यात सर्वाधिक प्रकरणे ही उत्तर प्रदेशातून मिळालेली आहेत. 2009 ते 15 फेब्रुवारी 2013 या कालावधीत बनावट एन्काउंटरच्या 555 तक्रारी मिळाल्या आहेत. त्यापैकी केवळ 144 प्रकरणांचाच निपटारा होऊ शकला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यासंदर्भात संबंधित राज्यांना तपास अहवाल, शवविच्छेदन अहवाल, न्यायदंडाधिकार्‍यांचा तपास अहवाल आदी माहिती उपलब्ध करून देण्याच्या कामात गतिमानता आणावी, असे निर्देश दिले आहेत.