आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Performance Based Insensitive Scheme Latest News In Marathi

सरकारी बाबूंनो, काम दाखवा; दाम मिळवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘मॅक्झिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट हा मंत्र जपत सत्तारूढ झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना कामगिरीवर आधारित मोबदला (परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह) देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) कामगिरीवर आधारित मोबदला योजनेवर (पीआरआयएस) पंतप्रधानांसमोर लवकरच सादरीकरणाची तयारी चालवली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग या योजनेचा आराखडा तयार करणार असून, पंतप्रधानांकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर सविस्तर दिशानिर्देश तयार करण्यात येतील, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.

अशी आहे योजना
यूपीए सरकारच्या कार्यकाळात निश्चित केलेल्या दिशानिर्देशांनुसार, विचाराधीन कालावधीत संस्था आणि कर्मचारी यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यावर आधारित मोबदला दिला जाईल. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांची संख्या जवळपास 50 लाख आहे.

अशी आहे व्याख्या : कामगिरीवर आधारित मोबदला (पीआरआयएस) म्हणजे प्रत्येक वर्षासाठी (अथवा निश्चित कालावधीसाठी) दिला जाणारा वेतनाचा बदलणारा भाग. ही योजना कर्मचार्‍याच्या वैयक्तिक, संघ पातळीवर अथवा गट पातळीवर लागू केली जाते.

पीआरआय योजनाही राबवणार
यूपीए सरकारच्या प्राथमिक दिशानिर्देशांनुसार, वेतन वाढी, श्रेणी पदोन्नती अथवा सेवा आधारित वाढ, काही विशिष्ट पदांशी संबंधित विविध भत्ते (उदा. ओव्हरटाइम व विशिष्ट भौगोलिक विभागात कामासाठी दिले जाणारे भत्ते) याव्यतिरिक्त पीआरआय योजना असेल. अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारितील खर्च विभाग योजना राबवतील.