आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Permanent Bilateral Relations With Pakistan, Foreign Minister V. K. Singh's Lok Sabha Explanation

पाकसोबतचे द्विपक्षीय संबंध कायम, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांचे लोकसभेत स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरू असल्या तरी शेजारी राष्ट्रासोबतचे द्विपक्षीय संबंध अद्याप संपुष्टात आलेले नाहीत. त्यासंबंधीचे करार जैसे थे आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी बुधवारी लोकसभेत स्पष्ट केले.

अनेक भारतीय मासेमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यासंबंधीच्या प्रश्नावर सिंग म्हणाले, उभय देशांतील संबंधात तणाव आहे, परंतु त्याचा द्विपक्षीय करारांवर काहीही परिणाम झालेला नाही. भारतीय मासेमारांच्या सुटकेसाठी योग्य दिशेने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी दोन्ही देशांनी आपापल्या देशातील कैद्यांशी मानवी पातळीवर व्यवहार करण्यासाठी २००८ मध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली होती. अशा कैद्यांना चांगली वागणूक मिळावी, यासाठी समितीने काही शिफारशी केल्या होत्या. समितीने २०१३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती.
बातम्या आणखी आहेत...