आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांचे असताना डोक्यावरून वडिलांचा हात गेला... टिळकांवरील खटले आणि जीवन परिचय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव लोकमान्य श्री बाळ गंगाधर टिळक होते. त्यांच्या वडीलांचे नाव श्री गंगाधर रामचंद्र टिळक होते. गंगाधर आधी रत्नागिरीमध्ये साहायक शिक्षक होते. त्यानंतर पुणे आणि नंतर ठाण्यात साहायक उपशिक्षण निरिक्षक झाले. त्या काळी ते अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. त्यांनी  'त्रिकोणमिति' आणि 'व्याकरण' या विषयांवर पुस्तके लिहिली. गंगाधर यांचे 1872 मध्ये निधन झाले. त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभागाबाई टिळक होते. रमाबाई वैद्य, पार्वतीबाई केळकर, विश्वनाथ टिळक, रामभाऊ टिळक, श्रीधर टिळक आणि रमाबाई साने अशी त्यांना मुले होते. सध्या टिळकांच्या कुटुंबातील रोहित टिळक हे राजकारणात आहेत. 
 
 
टिळक आणि खटले 
बापट केस 

1894 मध्ये टिळक एका महत्त्वाच्या खटल्यात व्यस्त होते. हा खटला होता बापट खटला. रावसाहेब डब्ल्यू. एस. बापट हे बंदोबस्त विभागाचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते. हा बंदोबस्त विभागाच्या विरोधातील षडयंत्राचा एक भागा होता. हे षडयंत्र ब्रिटीशांचा एक कारनामा होता. या खटल्याचे काही वैशिष्ट्यही होते. हा खटला महाराजांच्या गैरहजेरीत चालवला जात होता. महाराज तेव्हा यूरोप दौऱ्यावर होते. या खटल्या दरम्यान अशाकाही गोष्टी समोर आणायच्या की त्यामुळे महाराजांच्या प्रशासन पकडीवर प्रश्न निर्माण झाले पाहिजे, असाही प्रयत्न त्यात होता. लोक केवळ बंदोबस्त विभागातील भ्रष्टाचारानेच संतप्त नव्हते तर उच्च अधिकाऱ्यांवरही नाराज होते. हेही तितकेच खरे होते की बापटांना बळीचा बकरा बनवले जात होते. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर होतीच परंतू दुसऱ्यांच्या गुन्ह्यांचीही शिक्षा त्यांना मिळणार होती. बचावपक्षाकडून एम.सी. आपटे आणि डी.ए. खरे वकील होते. मात्र बचावाची संपूर्ण जबाबादारी टिळकांवरच होती. 
 
 
राजद्रोहाचा खटला 
- टिळक पूर्णपणे स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यामुळे ते ब्रिटीश सरकारचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जात होते. 1897 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला गेला. या खटल्यात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. 
-  1905 मध्ये व्हाइसरॉय लॉर्ड कर्जनने बंगालचे विभाजन केले तेव्हा टिळक त्याविरोधत उभे राहिले. बंगालच्या नागरिकांनी केलेल्या विभाजन रद्द करण्याच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. 
- ब्रिटीशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचेही ते पुरस्कर्ते होते. या आंदोलनाने लवकरच देशव्यापी रूप धारण केले होते. पुढील वर्षी त्यांनी सत्याग्रहाच्या आंदोलनाची रुपरेषा ठरवली. 
- त्यांना आशा होती की यामुळे ब्रिटीश शासनाच्या संमोहनाचा प्रभाव कमी होऊन जनतेमध्ये स्वातंत्र्याप्रती बलीदानाची भावना निर्माण होईल. पुढे महात्मा गांधींनी विदेशी वस्तूंच्या बहिष्काराचे आंदोलन मोठे केले. त्यासोबतच अहिंसक आंदोलन केले. 
-24 जून 1908 रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून 17 जून 1914 रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. 
 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... टिळक यांच्या आयुष्याचा प्रवास आणि कसा झाला मृत्यू...
 
बातम्या आणखी आहेत...