आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pervez Musharraf Said Indian PM Narendra Modi Is Anti Muslim & Anti Pakistan

पाकचा पुन्हा काश्मीर राग; मुशर्रफ म्हणाले, \'मोदी पाकिस्तान आणि मुस्लिम विरोधी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग अळवला आहे. जोपर्यंत काश्मीर मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत भारताशी बातचीत शक्य नसल्याचे, पाकिस्तान सरकारच्या माहिती विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती निवृत्त जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी मुस्लीम विरोधी आहे आणि त्यांचे धोरण पाकिस्तान विरोधी असल्याचे मुशर्रफ म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 1971 नंतर झालेली ही सर्वात मोठी शस्त्रसंधी असल्याचे म्हटले जाते. तर, पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी भारताच्या विरोधानंतरही बंडखोर नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे भारत सरकारने दोन्ही देशां दरम्यान नियोजीत परराष्ट्र सचिवस्तरीय बैठक रद्द केली.
'मोदी मुस्लिम विरोधी'
मुशर्रफ यांनी पाकिस्तानी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, 'मी मोदी साहेबांबद्दल काही बोलू इच्छितो. आपल्याला त्यांच्या सरकारच्या कामकाजाकजावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही मोदी साहेबांना मुळातून समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते मुस्लिम आणि पाकिस्तान विरोधी आहेत. यात काहीही शंका नाही.'
'भारताला सहजतेने घेऊ नये'
मुशर्रफ म्हणाले, 'भारताला सहजतने घेऊ नये. कारण त्या देशाकडे न्यूक्लिअर पॉवर आहे.' मुशर्रफ म्हणाले, 'आपलेही शक्तीशाली राष्ट्र आहे. जर ते मुस्लिम आणि पाकिस्तानविरोधी बोलत असतील तर, भारत आणि मोदी साहेबांनी लक्षात असू द्यावे की आमच्याकडेही न्यूक्लिअर पॉवर आहे. आम्हाला शांततेत आणि सन्मानाने राहायचे आहे. याचा अर्थ पाकिस्तान काही करु शकत नाही असा घेऊ नये. ते आपल्याला काहीच करु शकत नाही.'
'मोदी काही व्हाइसरॉय नाही'
मुशर्रफ म्हणाले, 'आपण स्वतःहून कोणत्याही संघर्षात अडकण्याची गरज नाही. ते तिथले पंतप्रधान आहेत. अजून त्यांनी पाकिस्तान संदर्भातील पत्ते खोलले नाहीत. त्यांनी मुस्लिम किंवा पाकिस्तानविरोधात काही टिप्पणी केल्याचे आपण ऐकलेले नाही. आपल्याला त्यांच्याकडून काय होते, याची वाट पाहिले पाहिजे. आपल्याकडून असे कोणतेही कृत्य घडले नाही पाहिजे, की जणू काही ते व्हाइसरॉय आहेत. आपल्याचा त्यांची साहनुभूती मिळवण्याची घाई करण्याची गरज नाही.

संग्रहित छायाचित्र - परवेझ मुशर्रफ