आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल यांच्याविरोधातील याचिका फेटाळली; सुरक्षा कडे तोडल्याचे प्रकरण, भाजप नेत्याची याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एसपीजीचे सुरक्षा कडे तोडल्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई भाजपचे एक प्रवक्ते तुहिन ए. सिन्हा यांनी राहुल यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती.


राहुल यांनी विशेष सुरक्षा अधिनियमाचे उल्लंघन करू नये. सुरक्षा कड्याला भेदून बाहेर पडून त्यांनी स्वत:ला संकटात टाकता कामा नये, ही गोष्ट निश्चित करावी,अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. राहुल यांना त्याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती त्याद्वारे करण्यात आली होती. त्यांनी एसपीजीविना प्रवास करू नये.


याच वर्षी गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करताना गांधी यांच्या कारवर काही लोकांनी दगडफेक केली होती. याचिकेला काळजीवाहू मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल व न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांच्या पीठाने फेटाळले. सुरक्षेवर निर्णय घेण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही. सुरक्षेसाठी आम्हीदेखील सरकारवर अवलंबून आहोत. आम्ही त्यांच्या आकलनावर विश्वास ठेवतो. प्रकरणात एखाद्यावर कारवाई करणे गरजेचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र अधिकारी आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


बेजबाबदारपणाचे वर्तन : सोनी
सरकारदेखील राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरून चिंतित आहे. परंतु सुरक्षेचे कडे पार करून बाहेर पडणे बेजबाबदारपणाचे वर्तन आहे. त्यांना काही झाल्यास आम्हाला (सरकार) जबाबदार ठरवले जाईल, असे सरकारी वकील अनिल सोनी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...