आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - महात्मा गांधींच्या हत्येच्या आरोपात 15 नोव्हेंबर 1949 ला नथुराम गोडसेबरोबर नारायण दत्तात्रय आपटेलाही फाशी देण्यात आली होती. त्याच्या 68 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात बुधवारी एक याचिका दाखल करून दावा करण्यात आला आहे की, आपटेच्या ओळखीबाबत संशय आहे. यासाठी गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आपटेच्या ओळखीबाबत संशय का?
- गांधीजींच्या हत्येमागे असलेल्या कटाचा शोध लावण्यासाठी 1966 मध्ये तयार करण्यात आलेल्या जस्टीस जेएल कपूर कमिशनने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, आपटे इंडियन एअरफोर्समध्ये होता.
- मात्र याचिकाकर्ते डॉ. पंकज फडणीस यांनी दावा केला आहे की, संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकर यांनी त्यांना 7 जानेवारी 2016 ला एक पत्र पाठवले होते. त्यात म्हटले होते की, आपटे एअरफोर्सचे ऑफिसर होते, अशी काहीही माहिती मिळालेली नाही.
कोण आहेत डॉ. फडणीस?
- डॉ. फडणीस एक रिसर्च आणि अभिनव भारत मुंबईचे ट्रस्टी आहेत. त्यांनी गांधीजींच्या हत्येच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हा सत्यावर पडदा टाकणाऱ्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रकारांपैकी एख प्रकार आहे.
- त्यांनी याचिकेत पर्रिकरांकडून आलेले पत्रही जोडले आहे.
- याचिकेत म्हटले आहे की, या माहितीवरून 30 जानेवारी 1948 ला झालेल्या महात्मा गांधींच्या हत्येत विदेशींचा हात असल्याचे समोर येते.
ब्रिटिश फोर्स 136 वर प्रश्नचिन्ह..
- फडणीस यांनी पर्रिकर यांच्या पत्राच्या आधारे ही केस पुन्हा उघडण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपटे ब्रिटिश फोर्स 136 साठी काम करत होते, यासाठी हा ठोस पुरावा आहे. तपासातून ही बाब सिद्ध होऊ शकते.
थ्री-बुलेट थेअरीवरही सवाल..
- सुप्रीम कोर्टाने फडणीस यांच्याकडून सादर करण्यात आलेली याचिका आणि दस्तऐवजांच्या तपासासाठी सीनियर अॅडवोकेट अमरेंद्र शरण यांना न्याय मित्र (amicus curaie) म्हणून नेमले आहे.
- फडणीस यांनी गांधीजींच्या हत्येमधील थ्री-बुलेट थेअरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, नथुराम गोडसेंशिवाय आणकी कोणी तरी दुसरीकडून चौथी गोळीही मारली होती का?
चार्जशीटमध्ये होते 12 जणांचे नाव...
- गांधीजींच्या हत्येच्या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आळेल्या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावे होती.
- दिगंबर आर बडगे नावाचा आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता. पाच जणांना जन्मठेप झाली होती. तिघांना फरार घोषित करण्यात आले होते. गोडसे आणि आप्टे यांना 15 नोव्हेंबर 1949 ला अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली होती. तर विनायक दामोदर सावरकर यांना संशयाचा फायदा देत सोडण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.