आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल ४९ पैसे, डिझेल १.२१ रुपयांनी स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात लिटरमागे ४९ पैसे तर डिझेल १.२१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. जेट इंधनच्या दरातही २ टक्क्यांची कर कपात झाली तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर ११ रुपयांनी महाग झाले आहे. बुधवार मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील. यात स्थानिक करांचा समावेश नाही.
याआधी १६ फेब्रुवारीला पेट्रोल ८२ पैसे, तर डिझेल ६१ पैशांनी महागले होते. यानंतर १ मार्चला पेट्रोल ३.१८ रुपये व डिझेल ३.०९ रुपयांनी महागले होते. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलच्या किमती व रुपया-डॉलरचा विनिमय दरही घटला होता.
या दोन्ही घटना दरकपातीसाठी लाभकारक ठरल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. ऑगस्ट २०१४ पासून पेट्रोल दरात १० वेळा तर ऑक्टोबर २०१४ पासून डिझेल सहाव्यांदा स्वस्त झाले आहे. ऑगस्ट २०१४ पासून पेट्रोल १७.११ रुपये तर डिझेल १२.९६ रुपयांनी स्वस्त झाले.