नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणारी घट देशाला दिलासा देणारी ठरली आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात केल्याची घोषणा शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर जवळपास अडीच -अडीच रुपयांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. औरंगाबादच्या भारत पेट्रोलियमच्या पंपांवर मध्यरात्रीपासून पेट्रोल 66.59 रुपये प्रति लिटर तर डिझेल 57.01 रुपये प्रति लिटर मिळणार आहे. पुण्यात नवीन दरांनुसार 66.75 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर असेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 50 डॉलरवर आल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी झाले आहेत. पेट्रोलच्या दरात 2 रुपये 42 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 25 पैशांनी प्रति लिटरप्रमाणे कपात करण्यात आली आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्याची घोषणा केली असली तरी सरकारने एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे पंपावरील किमतीत फरक पडण्याची शक्यता कमीच आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर दोन रूपयांनी एक्साईज ड्युटी वाढवली होती.
दरम्यान, मागणी कमी झाल्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलच्या दर प्रति बॅरल 50 डॉलर पेक्षाही खाली घसरले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 2014 मध्ये सहा महिन्या पेट्रोलच्या दरात आठ वेळा झाली कपात...