Home »National »Delhi» Petrol And Diesel Prices At 3 Year High News And Updates

पेट्रोल-डीझेलच्या दरांनी गाठला 3 वर्षांतील उच्चांक, पेट्रोलियम मंत्रालयाने बोलावली बैठक

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 03:47 AM IST

दिल्ली-पेट्रोल-डिझेलच्या दराने ३ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत बुधवारी पेट्रोल ७९.४८ रुपये व दिल्लीत ७०.३८ लिटर झाले. यापूर्वी १ ऑगस्ट २०१४ ला मुंबईत पेट्रोल ८०.६० रुपये होते. यंदा १६ जूनपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. तेव्हापासून पेट्रोल ७.४८% व डिझेल ७.७६% महागले आहे. मात्र, यात हस्तक्षेप करणार नाही, असे केंद्राचे म्हणणे आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, सरकार दरनिश्चितीची पद्धत बदलणार नाही. पेट्रो उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करावा. कर कपातीचा निर्णय अर्थ मंत्रालयच घेऊ शकते. ४ महिन्यांत केंद्र व राज्यांनी अबकारी शुल्कापोटी १.१३ लाख कोटी, तर तेल कंपन्यांनी १७.५ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत.
3 सरकारी कारणे
> अमेरिकेतील हार्वे-इरमा वादळाने क्रूड उत्पादनावर परिणाम होऊन क्रूडचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
> काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल १८% अाणि डिझेल २०% महागले आहे.
> सप्टेंबरमध्ये भारतीय बास्केट क्रूडचे दर १७१ रु. प्रतिबॅरल म्हणजे ५% महागले आहेत.
कच्चे तेल: ३ वर्षांत ४६% स्वस्त झाले
३ वर्षांत क्रूडची भारतीय बास्केट ४६% हून जास्त स्वस्त झाली. ऑगस्टमध्ये क्रूड ६,२९१.९१ रु. बॅरल होते. ते आता ३,३९२.९० रुपये प्रतिबॅरल झाले आहे.
मात्र, सरकारने... पेट्रोलवरील अबकारी कर १२६% व डिझेलवर ३८७% पर्यत वाढवला
पेट्रोल
: ऑगस्ट २०१४ मध्ये अबकारी शुल्क ९.४८ रुपये होते. आता ते २१.४८ रुपये प्रतिलिटर आहे.
- 73 हजार कोटी रु. ४ महिन्यांत केंद्राने अबकारी शुल्काच्या माध्यमातून वसूल केले.
डिझेल: ऑगस्ट २०१४ मध्ये ३.५६ रुपये हाेते. आता ते १७.३३ रुपये झाले.
- 42 हजार कोटी रु. राज्यांनी व्हॅटद्वारे वसूल केले. दोघे मिळून १.१५ लाख कोटी रुपये.

Next Article

Recommended