आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल,डिझेलवर राज्यांनी 5 % व्हॅट घटवावा; केंद्र सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पेट्रोल व डिझेलवर एक्साइज शुल्क २ रुपयांनी घटवल्यानंतर आता राज्यांनीही त्यावरील व्हॅट ५% कमी करावा, असे केंद्राने सांगितले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणालेे, याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. ढाका येथील या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना अरुण जेटली म्हणाले, पेट्रोलियम पदार्थांवरील करांचा सर्वाधिक हिस्सा राज्यांनाच मिळतो. ते व्हॅटचीही आकारणी करतातच. केंद्राच्या एक्साइज शुल्कातही त्यांचा ४२% वाटा असतो.
 
महाराष्ट्रात सर्वाधिक ४६.५२ टक्के व्हॅट
पेट्रोल-डिझेलवर राज्ये २६ ते ४८% पर्यंत व्हॅट आकारतात. भाजपशासित महाराष्ट्रात पेट्रोलवर तब्बल ४६.५२% व्हॅट आहे. मंुबईत तर तो देशात सर्वाधिक ४७.६४% आहे. दिल्लीत पेट्राेलवर २७% व्हॅट अाहे. एक्साइज शुल्क प्रतिलिटरवर ठरते. मात्र व्हॅटची अाकारणी ही किमतीवर केली जाते. यामुळे जेव्हा किमत वाढते तेव्हा वॅटही वाढताे.
बातम्या आणखी आहेत...