आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

I-DAY : पेट्रोल १ रुपया २७ तर डिझेल १ रुपया १७ पैशांनी स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किमती घसरल्यामुळे लिटरमागे पेट्रोल १ रुपया २७ पैशांनी तर डिझेल १ रुपया १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. नवीन दर शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच लागू झाले आहेत, असे इंडियन ऑइलने म्हटले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या भावातील ऑगस्ट महिन्यातील ही दुसरी दरकपात आहे. यापूर्वी १ ऑगस्ट रोजी पेट्रोल २.४३ रुपयांनी तर डिझेल ३.६० रुपयांनी स्वस्त झाले होते. तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वधारलेले मूल्य याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर झाला आहे.