आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढीची पद्धत कायम; डिझेल महागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी काळात पेट्रोल व डिझेलची दरवाढ होऊ शकते. इंडियन ऑइलने याचे स्पष्ट संकेत दिले.
कंपनीचे सीएमडी आर. एस. बुटोला म्हणाले, डिझेलच्या दरात दर महिन्याला 40 ते 50 पैसे वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने पूर्वी घेतलेला आहे. याबाबत नव्या सरकारने काहीही आदेश दिलेला नाही. त्यामुळे दरवाढीची ही पद्धत कायम राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या दरात सध्या तेजी आहे. याशिवाय आगामी काळात रुपयाची स्थिती कशी राहते, यावर विचार करूनच पेट्रोल दरवाढीचा निर्णय घेतला जाईल, असेही बुटोला म्हणाले. शनिवारी कंपनी डिझेल व पेट्रोलच्या दरांचा आढावा घेणार आहे.
सध्या तेल कंपन्यांना डिझेलच्या विक्रीत लिटरमागे 4.41 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. मार्चमध्ये हा तोटा 8.34 रुपये होता.
कृषिसेवा केंद्रे लॉटरी पद्धतीने : पेट्रोल पंप, गॅस एजन्सीप्रमाणेच कृषिसेवा केंदे्रही आगामी काळात लॉटरी पद्धतीने वितरित केली जाणार आहेत. यामुळे अशा सेवा केंद्रांच्या वाटपात अधिक पारदर्शकता येईल, असे बुटोला म्हणाले.
किराणा दुकानांत छोटे सिलिंडर
पाच किलोग्रॅम वजनाचे छोटे एलपीजी सिलिंडर किराणा दुकानांतही उपलब्ध होणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बुटोला यांनी दिली.