आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दर रोज बदलणार; 1 मेपासून देशातील पाच शहरांत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या १ मेपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला अनुरूप दर दिवशी बदलतील. जगातील बहुतांश विकसित देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव दररोजच बदलतात. प्रायोगिक तत्त्वावर देशातील पाच शहरांत याची सुरुवात होईल.  

इंडियन ऑइल काॅर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या देशातील पाच निवडक शहरांत दैनंदिन आधारावर पेट्रोल- डिझेलचे भाव निश्चित करण्याची योजना सुरू करणार आहेत. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशभर ही योजना लागू केली जाईल. देशातील एकूण  ५८,००० पेट्रोल पंपांपैकी ९५ टक्के पेट्रोल पंप याच कंपन्यांचे आहेत. जून २०१० मध्ये सरकारने पेट्रोलचे भाव सरकारी नियंत्रणातून मुक्त केले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये डिझेलचे भावही नियंत्रणमुक्त करण्यात आले होते. तांत्रिकदृष्ट्या तेल कंपन्यांना पेट्रोल- डिझेलचे भाव निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, राजकीय परिस्थिती पाहून त्यांना नेहमीच संकेत देण्यात आले आहेत.

या ५ शहरांत सुरुवात
एक महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजस्थानातील उदयपूर, झारखंडमधील जमशेदपूर व चंदिगड या पाच शहरांत ही योजना लागू हाेईल, असे आयओसीचे चेअरमन बी. अशोक म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...