आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात पेट्राेल-डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात, दिल्लीकरांना नाही मिळणार फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अांतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींनुसार घेण्यात येणाऱ्या अाढाव्यानुसार देशातील पेट्राेल अाणि डिझेल विक्रीच्या दरात दाेन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात अाला. नवे दर लगेचच मध्यरात्रीपासून लागू झाले अाहेत. मात्र त्याचा फायदा दिल्लीकरांना मिळणार नाही. दिल्ली सरकारने इंधनावरील व्हॅट वाढविल्याने येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याऐवजी वाढ झाली आहे. स्थानिक करांमध्ये त्यामुळे हाेणाऱ्या बदलांनुसार शहरांनिहाय दर भिन्न असतील.

दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 20 वरुन 25 टक्के वाढविला आहे. त्याचबरोबर डिझेलवरील व्हॅटमध्ये 12.5 टक्क्यांवरून 16.6 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील इंधनाच्या दरात फक्त 50 पैशांनी कपात झाली आहे. आपचे दिल्लीत सरकार आल्यानंतर त्यांनी व्हॅटमध्ये केलेली ही पहिली दरवाढ आहे.
पेट्रोल आणि डिझेल दर (रुपये प्रति लिटर):
पेट्रोल :
शहरजुने दरनवे दर
दिल्ली66.6266.90
भोपाळ73.4970.84
जयपुर72.4969.87
कोलकाता74.0971.57
मुंबई74.5271.97
चेन्नई69.84
67.29
रांची68.3265.86
डिझेल:
शहरजुने दरनवे दर
दिल्ली50.2249.72
भोपाळ57.4754.90
जयपुर55.3152.86
कोलकाता54.7552.75
मुंबई57.6455.15
चेन्नई53.5251.08
रांची55.4052.95
बातम्या आणखी आहेत...