आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Price Cut By Rs 1.82 Per Litre, Diesel Hiked By 50 Paise

औरंगाबादेत पेट्रोल २.२० रुपये स्वस्त, डिझेल मात्र महागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पेट्रोलमहिनाभरात तिसऱ्यांदा स्वस्त झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल १.८२ रुपयांनी स्वस्त झाले. औरंगाबादेत मात्र २.२० रुपयांची दरकपात झाली आहे. विनासबसिडीचे स्वयंपाकाचे गॅस सिलिंडरही १९ रुपयांनी स्वस्त झाले. मात्र डिझेल प्रतिलिटर ५० पैशांनी महागले आहे.
यापूर्वी पेट्रोलचे भाव १५ ऑगस्ट रोजी रुपये १८ पैसे आणि एक ऑगस्ट रोजी रुपये ०९ पैशांनी कमी झाले होते. म्हणजेच एक महिन्यात पेट्रोल ६.९१ टक्क्यांनी स्वस्त झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे पेट्रोल स्वस्त झाले आहे. पेट्रोलचा हा गेल्या १४ महिन्यांतील सर्वात कमी भाव आहे.