आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Petrol Price Cut By Rs 2.42 A Litre; Diesel By Rs 2.25 Per Litre

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१८ दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल २.४२, तर डिझेल २.२५ रु. स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरच पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोलचे दर लिटरमागे २.४२ रुपये, तर डिझेलचे दर २.२५ रुपयांनी कमी झाले आहेत. करांसह दिल्लीत या दोन्ही इंधनांचे भाव अनुक्रमे ५६.४९ आणि ४६.०१ रुपये लिटर झाले आहेत. ऑगस्ट २०१४पासून पेट्रोल १० वेळा, तर ऑक्टोबरपासून डिझेल सलग सहा वेळा स्वस्त झाले आहे. १८ दिवसांपूर्वी म्हणजे १६ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलचे दर एवढेच कमी करण्यात आले होते.

- पंधरवड्यात कंपन्यांचा खर्च 10% घटला, ग्राहकांना मिळाला फक्त 4%च फायदा
- कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा पूर्ण लाभ दरवेळीप्रमाणे आताही ग्राहकांना मिळाला नाही
- १८ दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले होते. तेव्हापासून आजवर पंधरवड्यात कच्चे तेल सरासरी १०.२५% घसरले.
- पेट्रोल केवळ ४.१०%, डिझेल ४.६६% स्वस्त करण्यात आले.
म्हणजे पेट्रोलवर ६.१५%, तर डिझेलवर ५.५९% फायदा सरकार आणि कंपन्यांच्या तिजोरीत गेला.

इंडियन ऑइलने तफावतीचा ताळेबंद साइटवरून काढला
इंडियन ऑइलच्या संकेतस्थळावर आधी दरपत्रक दिले जायचे. ग्राहकांना किती दर लावला जातो. सरकार, रिफायनरी, तेल कंपन्यांना किती जातात हे त्यातून कळायचे. परंतु कंपनीने आपल्या साइटवरून आता ही माहितीच काढून टाकली आहे.

औरंगाबादेतील इंधनाचे दर
जुने नवे कपात

पेट्रोल ६६.४५ रु 63. 94 रु २.५१ रु
डिझेल ५६.७८ रु 54. 25 रु २.५३ रु