आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल 75, डिझेल 50 पैशांनी महागले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 75 पैसे, तर डिझेलमध्ये 50 पैशांची दरवाढ केली आहे. मात्र यात स्थानिक कर व व्हॅटचा समावेश नसल्याने शहरांनुसार प्रत्यक्षात दर महागच असतील. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. यामुळेच ही दरवाढ केली जात असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले. यापूर्वी 21 डिसेंबरला पेट्रोल 41 पैशांनी महागले होते.
डिझेलमध्ये शेवटच्या वेळी 21 डिसेंबरला कोणत्याही करांविना 10 पैशांची वाढ झाली होती.
एका वर्षात डिझेल 7.19 रुपयांनी महागले : डिझेलमध्ये दरमहा 50 पैशांनी दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने जानेवारी 2013 मध्ये घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत डिझेलमध्ये तब्बल 12 वेळा दरवाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच आतापर्यंत डिझेल स्थानिक करांविना 7.19 रुपयांनी महागलेले आहे. यानंतरही डिझेल विक्रीवर लिटरमागे 9.24 रुपयांता तोटा होत असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पाेरेशनने म्हटले आहे.