आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Prices Cut By 32 Paise, Diesel Slashed By 85 Paise

डिझेल 85 पैशांनी, पेट्रोल 32 पैशांनी स्वस्त, नवीन दर मध्‍यरात्रीपासून लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्‍या दरांमध्‍ये कपात करण्‍यात आली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 32 पैसे, तर डिझेल प्रतिलीटर 85 पैशांनी स्वस्त होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत. आतंरराष्‍ट्रीय स्‍तरावर कच्‍च्या तेलाच्‍या किमती घटल्‍याने ही कपात होत आहे.
याआधीही झाली होती कपात
- यापूर्वी 16 डिसेंबरला पेट्रोलचे दर लीटरमागे 50 पैशांनी घटले होते.
- डिझेलचे दर लिटरमागे 46 पैशांनी कमी झाले होते.
- 1 डिसेंबरला पेट्रोल लिटरमागे 58 पैशांनी, तर डिझेल 25 पैशांनी स्‍वस्‍त झाले होते.
असे असतील नवीन दर
इंडियन ऑइल कॉरपोरेशनने दिलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी मध्‍यरात्री इंधन दरात कपात झाल्‍यानंतर दिल्‍लीमध्‍ये पेट्रोलचे नवीन दर 59.03 रूपये प्रतिलीटर असतील. तर, डिझेलचे नवीन दर 44.18 रूपये असणार आहे.
चार शहरांमध्‍ये असे असतील दर..
पेट्रोल
शहर नवीन दर जुने दर
दिल्‍ली 59. 03 59. 35
कोलकाता 64.87 65. 12
मुंबई 66.09 66.40
चेन्‍नई 59.45 59.77
डिझेल
शहर नवीन दर जुने दर
दिल्‍ली 44.18 45.03
कोलकाता 48.07 48.80
मुंबई 51.25 52.16
चेन्‍नई 45.36 46.25