आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Prices Hiked By Rs 1.55 Per Litre With Effect From From Midnight Tonight.

पेट्रोल प्रतिलिटर 1.55 रुपयांनी महागले, दोन महिन्‍यांमधील चौथी दरवाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तेल कंपन्‍यांनी पेट्रोलचे दर पुन्‍हा वाढविले आहेत. पेट्रोलच्‍या दरात 1.55 रुपयांची वाढ करण्‍यात आली आहे. आज मध्‍यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरवाढीमागे रुपयाचे अवमुल्‍यन हे प्रमुख कारण आहे.

जूनपासून चार वेळा तिस-यांदा पेट्रोलचे दर वाढविण्‍यात आले आहेत. याआधी पेट्रोलच्या दरात एक जूनला 75 पैशांनी तर 16 जूनला दोन रुपयांनी वाढ झाली होती. त्‍यानंतर 28 जूनला 1.85 रुपयांनी दर वाढविण्‍यात आले होते. जुलैच्‍या पहिल्‍या आठवड्यात राज्‍य सरकारने काही करांमध्‍ये कपात केली होती. त्‍यामुळे पेट्रोल 1 रुपयाने स्‍वस्‍त झाले होते. परंतु, पुन्‍हा एकदा जनतेला दरवाढीचा दणका बसला आहे.

रुपयाचे विक्रमी अवमुल्‍यन झाल्‍यामुळे इंधनाची आयात महागली आहे. परिणामी तेल कंपन्‍यांना पेट्रोल विक्रीतून प्रतिलिटर सुमारे 10 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाने जुलैच्‍या पहिल्‍याच आठवड्यात 61 ची पातळी ओलांडली होती. त्‍यामुळे ही दरवाढ अटळ होती.