आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल ३, डिझेल १.९० रु. महागले, नवीन दर बुधवार मध्यरात्रीपासून लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोल प्रतिलिटर ३.०७ रुपये तर डिझेल १.९० रुपयांनी महागले आहे. नवीन दर बुधवार मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. त्यात स्थानिक शुल्क व करांचा समावेश नाही.
ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ५६.६१ रुपयांवरून ५९.८६ रुपये प्रतिलिटर झाले आहे. डिझेलही ४६.४३ रुपयांवरून ४८.३३ रुपये प्रतिलिटर झाले. विशेष म्हणजे १ मार्चला पेट्रोल दरात ३.०२ रुपयांची कपात करण्यात आली होती. फेब्रुवारीपासून डिझेलच्या दरांत तीन वेळेस (एकूण ३.६५ रुपये)वाढ करण्यात आली. तेल कंपन्यांकडून प्रत्येक पंधरवड्याला इंधनाच्या दरांचा आढावा घेण्यात येतो.
बातम्या आणखी आहेत...