आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Prices Slashed By 49 Paise, Diesel By Rs 1.21

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, बुधवारी मध्यरात्रीपासून नवे दर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्व्हिस टॅक्समध्ये झालेल्या वाढी मुळे अनेक वस्तू आणि सेवा महागल्या असल्या तरी केंद्र सरकारने इंधन दरात कपात करुन सर्वसामान्यांना थोडासा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात 49 पैसे आणि डिझेलच्या दरात 1.21 पैसे कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज (बुधवार) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नव्या दरामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 60 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 48.50 रुपये प्रती लिटर दराने मिळणार आहे.
अर्थसंकल्प जाहिर झाल्यानंतर 28 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 3.18 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.09 रुपये वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींवरून पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरविण्यात येतात. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिजेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.