आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलचे दर तीन वर्षांत झाले सर्वाधिक महाग, या काळात कच्चे तेल 45 टक्क्यांनी स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर ७९.४१ रुपये आणि दिल्लीत ७०.३० रुपये प्रतिलिटर झाले. हा तीन वर्षांचा उच्चांक आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१४ ला मुंबईत पेट्रोल ८०.६० रुपये दिल्लीत १५ ऑगस्ट २०१४ ला ७०.३३ रुपये होते. 

यंदा १६ जूनपासून पेट्रोल-डिझेलचे दर केंद्राने नियंत्रणमुक्त केले. यामुळे दररोज त्याचे दर बदलत आहेत. तेव्हापासून पेट्रोल-डिझेलचे दर टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच सांगितले होते की, इंधन दर दररोज निश्चित करण्याची पद्धत अागामी काळातही जारी राहील. जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलात झालेल्या किरकोळ घसरणीचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही मिळू शकेल. 

सोमवारी दिल्लीत डिझेलचे दर ५८.६२ रुपये आणि मुंबईत ६२.२६ रुपये प्रतिलिटर होते. दिल्लीत यापूर्वीचा उच्चांक १६ जानेवारीला ५९.०२ रुपये मुंबईत मे रोजी ६३.१२ रुपये प्रतिलिटर होता. 

कच्च्या तेलात घसरण 
तीनवर्षांत क्रूड आॅइलची भारतीय बास्केट ४५%हून जास्त स्वस्त झाली. ऑगस्ट २०१४ मध्ये क्रूडचा भाव ६,२९१.९१ रुपये प्रतिबॅरल होता. आता तो ३,४२४,९४ रुपये झाला आहे. भारतीय बास्केटमध्ये दुबई आणि ओमानच्या ‘सावर ग्रेड’चा ७३% वाटा असतो. उर्वरित हिस्सा ‘स्वीट ग्रेड’च्या ब्रेंटचा आहे. एक बॅरल सुमारे १५९ लिटरचे असते. 
बातम्या आणखी आहेत...