आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल एक रुपयाने स्वस्त; महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वाढत्या महागाईमुळे होळपळलेल्य सामान्य जनतेला यूपीए सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात पुन्हा एक रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

गेल्या महिन्याभरात ही तिसरी दर कपात आहे. या महिन्यातच दोन एप्रिलला पेट्रोल दरात 85 पैशांची कपात करण्यात आली होती. तर गेल्या महिन्यात 15 मार्चला दोन रुपयांनी दर कमी करण्यात आले होते.

प्रमुख शहरातील पेट्रोलचे नवे दर
दिल्‍ली - 66.09 रुपये प्रति लीटर
मुंबई - 72.88 रुपये प्रति लीटर
बंगळुरू - 72.63 रुपये प्रति लीटर
कोलकाता 73.48 रुपये प्रति लीटर
चेन्‍नई - 69.08 रुपये प्रति लीटर
हैदराबाद- 72.14 रुपये प्रति लीटर