आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर 4 रुपयांनी स्वस्त होईल पेट्रोल; 11 वर्षांपूर्वीच्या दरात क्रूड ऑइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गडगडल्याने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन ते चार रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.गेल्या पंधरवड्यात कच्चे तेल (भारतीय बास्केट) ११ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. तेल कंपन्या पंधरवड्याला इंधन दरांचा आढावा घेतात. पुढील आढावा मंगळवारी होईल. सरकारने अबकारी करात वाढ केली नाही तर पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. गेल्या १८ महिन्यांत हा कर पाच वेळा वाढवला आहे. २६ नोव्हेंबरच्या पंधरवड्यात कच्च्या तेलाचे दर ४१.१७ डॉलर प्रतिबॅरल होते. ते गुरुवारी ३६.६५ डॉलरवर आले. डिसेंबर २००४ मध्ये कच्चे तेल याच दरपातळीवर होते.
पेट्रोल-डिझेल दोनच कारणांमुळे स्वस्त-महागते
१. कच्च्या तेलामुळे आणि
२. डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ उतारामुळे. सध्या दोन्हीही कारणे आहेत.
गेल्या १५ दिवसांत कच्चे तेल ११ टक्के स्वस्त झाले. दुसरीकडे, रुपयाही डॉलरच्या तुलनेत केवळ ०.४५ टक्केच कमकुवत झाला आहे.

जून-14 डिसें.-15 फरक (%)
>लोकांसाठी किरकोळ दर 71.46 60.48 -15.36
>तेल कंपन्यांचे मार्जिन 3.19 3.29 +3.13
>केंद्राला अबकारी व उपकर 9.48 19.06 +101.45
>डीलरला कमिशन 2.00 2.26 +13
(रिफायनरीचे दर 23.77 रु. आणि इतर 36.71 रु. कर, मार्जिन व कमिशनमध्ये)
बातम्या आणखी आहेत...