आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफची कपात ग्रॉस सॅलरीवर होणे शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वेतनाची व्याख्या नव्याने करण्याची तयारी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चालवली असून, त्यानुसार भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) कपात ग्रॉस सॅलरीवर करणे अनिवार्य केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी आणि कंपनी दोन्ही बाजूंचे पीएफमधील योगदान वाढेल.


वेतनाची सुस्पष्ट व्याख्या नसल्याने कंपन्या कर्मचार्‍यांच्या वेतनाची वेगवेगळय़ा भत्त्यांमध्ये विभागणी करतात. यामुळे पीएफमधील कंपन्यांचे योगदानही कमी होते. त्याचा फटका कर्मचार्‍यांना बसतो. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या पीएफमध्ये पुरेशी रक्कम जमा होत नाही. वेतनाची व्याख्या ठरवण्याच्या प्रस्तावाला तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली आहे, असे कामगार मंत्रालयाचे सचिव मृत्युंजय सारंगी यांनी या वेळी सांगितले.
तथापि, फिक्कीसारख्या औद्योगिक संघटनांचा त्यास विरोध आहे. मागील नोव्हेंबरमध्ये तत्कालीन भविष्य निधी आयुक्त आर.सी. मिश्रा यांनी ग्रॉस सॅलरीतून पीएफ कपात करण्याचा आदेश काढला होता. विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.