आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफ काढण्यासाठी रसीद तिकिटाची गरज नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी दाव्याच्या अर्जांवर आता एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प लावण्याची गरज राहणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पीएफचे ९७ टक्के दावे नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्स्फरद्वारे (एनईएफटी) होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एनईएफटीद्वारे पैसे दिले जात असतील तर रेव्हेन्यू स्टॅम्पची गरज नसते, असे मत कायदा आणि न्याय मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे कर्मचारी हा निर्णय घेतला आहे. कर्मचारी ईपीएफओशी करत असलेल्या व्यवहारात नियोक्त्यावरील अवलंबित्व संपुष्टात आणणे हा या मागचा हेतू आहे. नियोक्त्यावरील जास्तीच्या अवलंबित्वामुळे कर्मचारी ईपीएफओच्या अनेक सुविधांचा लाभच घेऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यामुळे हे अवलंबित्व संपुष्टात अाणण्याचे प्रयत्न अाहेत.