आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NATIONAL POLL: सरासरी 60 ते 65% मतदान, देशभरात विक्रमी मतदानाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात देशभरात सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. छत्तीसगड आणि झारखंडमध्ये सरासरी 60 ते 65 टक्के, कर्नाटकमध्ये सरासरी 65 टक्के, उत्तर प्रदेशात सरासरी 59 टक्के, मणिपूरमध्ये 71 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल 80 टक्के मतदानाची नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

लोकसभा निवडणूक 2014 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. नक्षलप्रभावीत भागातील मतदान दुपारी 3 वाजता संपले असून देशातील उर्वरित भागात सहा वाजेपर्यंत मतदान सुरु होते. देशातील 12 राज्यांमध्ये 121 जागांसाठी आज मतदान झाले. देशातील सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून जातो त्या उत्तरप्रदेशमध्ये सायंकाळी पाच वाजता पर्यंत 59 टक्के मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत सर्व 12 राज्यांमध्ये साधारण 40 टक्के मतदान झाले. झारखंडमधील काही घटना सोडल्यास सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान झाले. महाराष्ट्रातील 19 मतदारसंघामध्ये दुपारी 1 वाजता पर्यंत 35 टक्के मतदान झाले होते. सकाळपासूनच सर्वसामान्यांपासून 'खास' लोकांची रांगा लावल्याचे चित्र आज दिवसभर पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी सुरुवातीलाच मतदानाचा हक्क बाजवला आणि नंतर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.


यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील सर्वात महत्त्वाचा आजचा दिवस होता. आज लोकसभेच्या 22 टक्के जागांवर मतदान झाले. आजच्या मतदानानंतर लोकसभेच्या जवळपास 50 टक्के जागांवर मतदान पूर्ण झाले आहे.

पाचव्या टप्प्यात एक माजी पंतप्रधान, सहा माजी मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. लोकसभेसोबतच ओडिशाच्या 77 विधानसभा जागांसाठीही आज (गुरुवार) मतदान झाले.
LIVE UPDATE

बिहार
- पाटलीपुत्र येथील राजद उमेदवार मीसा भारती यांच्यावर इव्हिएम मशीन तोडल्याचा आरोप, पीठासीन अधिका-याने केला आहे.
- बिहारचे पोलिस महानिरीक्षक अभयानंद मतदानापासून वंचित राहिले आहेत. मतदान यादीमध्ये अभयानंद यांचे नाव नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
गेल्यावेळी देखील निवडणूक आयोगाच्या अशाच गलथानपणामुळे मी माझ्या अधिकारापासून वंचित राहिलो असल्याचे अभयानंद म्हणाले.
- बिहारमध्ये दुपारी तीन वाजता पर्यंत 44.9 टक्के मतदान झाले.
- पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. पाटलीपुत्रमधील विक्रम विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे.
- आज (गुरुवार) सकाळी मीसा भारती मतदानासाठी गेल्या तेव्हा मतदान केंद्रात लाईट नव्हती. त्यामुळे त्यांना अंधारात मतदान करावे लागले.
- मुंगेर लोकसभा मतदारसंघातील एका मतदानकेंद्रावर बॉम्ब सापडला आहे.
- बिहारमध्ये सकाळी 9 पर्यंत 11 टक्के मतदान झाले आहे.
जम्मू - काश्मिर
उधमपूर येथे केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद निवडणूक लढवत आहेत. येथे दुपारी एक पर्यंत 50 टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित घटना घडलेली नाही.
मध्यप्रदेश
- मध्य प्रदेशमध्ये दुपारी दोन वाजता पर्यंत 39.76 टक्के मतदान झाले आहे.
- दुपारी 12 पर्यंत 22 टक्के मतदान झाले होते.
- सकाळी 9 पर्यंत 11 टक्के मतदान झाले.
कर्नाटक
-
दुपीर एक वाजता पर्यंत 26 टक्के मतदान झाले आहे.
- कर्नाटकात 9 वाजतापर्यंत 11 टक्के मतदान झाले.
राजस्थान
-
राजस्थानमध्ये दुपारी 1 वाजता पर्यंत 29.60 टक्के मतदान
- भीलवाडा येथील बनेडा उपखंडच्या देश कलई या गावातील मतदान केंद्रावर मधमाशांनी हल्ला केला आहे. त्यामुळे मतदानात अडथळा निर्माण झाला आहे.
- राजस्थानमध्ये सकाळी 9 पर्यंत 14 टक्के मतदान झाले.
- जयपूरमध्ये पहिल्या एक तासात 7.65 टक्के मतदान झाले.
- बाडमेर येथे 9 वाजता पर्यंत 10 टक्के मतदान झाले.
- भाजपमधून हकालपट्टी झालेले जसवंतसिंह यांनी बाडमेर येथे मतदान केले.
उत्तरप्रदेश
सायंकाळी पाच वाजता पर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे.
आंवला येथे मतदान करु न शकल्यामुळे एका युवकाने मतदान केंद्रावरच आत्मदहन केले आहे. मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान करु न शकलेल्या युवकाने स्वतःला पेटवून घेत जीवन यात्रा संपवली आहे.
उत्तर प्रदेशात सकाळी 9 पर्यंत 13 टक्के मतदान झाले.
लखीमपूर - 9.6 टक्के
मुरादाबाद - 13 टक्के
अमरोहा - 11 टक्के
शाहजहांपूर - 12 टक्के
रामपूर - 10 टक्के
बरेली - 10.5 टक्के
आंवला - 13.5 टक्के
बदायूं - 12 टक्के
नगीना - 15 टक्के
खीरी - 9 टक्के
मुरादाबाद - 13 टक्के
- पीलीभीत येथे आम आमदी पार्टीचे उमेदवार राजीव अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनगढी येथे अग्रवाल यांनी मतदाना दरम्यान अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
- शाहजहांपूरमधील कटरा येथील दोन आणि तिलहारा येथील दोन गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

झारखंड
- बोकारा जिल्ह्यातील लुगूघाटी भागात नक्षलवादी आणि पोलिसांदरम्यान चकमक झाली. त्याआधी येथे बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटातील जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हजारीबाग येथील मुफ्फसिल पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओरिया गावात रस्त्यावर एक बॉम्ब सापडला आहे. त्याला निकामी करण्यात आले आहे.
- गिरिडीह जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी रात्री पासून 10 बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. पोलिस अधिक्षक क्रांतीकुमार म्हणाले, पीरटांड पोलिस स्टेशन अंतर्गत बिस्टूर येथे 7 बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत.
- राजधानी रांचीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि रांचीचे खासदार सुबोधकांत सहाय यांनी मतदान केले आहे.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये 11 वाजता पर्यंत 30 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 9 पर्यंत 15 टक्के मतदान झाले होते.
- छत्तीसगडमधील राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभिषेक सिंह यांनी सपत्नीक मतदान केले.
- छत्तीसगडच्या महासमुंद, राजनांदगाव आणि कांकेर या तीन मतदारसंघात आज मतदान होत आहे. येथे नक्षली हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने या भागात सतर्कतेचे आदेश आधीच दिले आहेत. या तिन्ही मतदारसंघात दुपारी तीन वाजता पर्यंत मतदान होणार आहे. तर इतर ठिकाणी सायंकाळी सहा पर्यंत मतदान होईल. या नक्षल प्रभावीत भागात सुरक्षेसाठी 153 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय स्थानिक पोलिसांचे जवळपास 20 हजार जवान सज्ज आहेत.
- हेलिकॉ्प्टरच्या गस्त पथकाला 24 तास सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बस्तरमध्ये झालेल्या हिंसेनंतर निवडणूक आयोगाने नक्षल प्रभावीत भागात सुरक्षेची नवी व्यवस्था केली आहे. त्यानुसार नक्षल प्रभावीत भागात सर्व एसपी आणि आयजी यांना पूर्णवेळ कंट्रोलरुम मध्ये थांबण्यास सांगण्यात आले असून प्रत्येक तासाला रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पश्चिम बंगाल
दुपारी तीन वाजता पर्यंत 60 टक्के मतदान झाले.
सकाळी 10 पर्यंत 29 टक्के मतदान झाले.
मतदानाच्या पहिल्या दोन तासात अर्थात 9 वाजता पर्यंत 21 टक्के मतदान झाले.
ओडिशा
सकाळी 10 वाजता पर्यंत 15 टक्के मतदान झाले आहे.
मणिपूर
मणिपूरमध्ये सकाळी 9 पर्यंत 10 टक्के मतदान झाले.
येथे सुरु आहे मतदान
राज्य जागा
कर्नाटक 28
राजस्थान 20
महाराष्ट्र 19
उत्तर प्रदेश 11
ओडिशा 11
मध्य प्रदेश 10
बिहार 07
झारखंड 06
प. बंगाल 04
छत्तीसगड 03
जम्मू-कश्मीर 01
मणिपुर 01
पुढील स्लाइडवर पाहा, मतदान करणारे प्रसिद्ध नेते.