आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wel Come Obama मोदींनी असे केले ओबामांचे स्वागत, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - बराक ओबामांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी.

नवी दिल्ली - येथील पालम विमानतळावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे स्वागत केले.
विमानातून उतरल्यानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रोटोकॉल तोडून ओबामांच्या स्वागतासाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अस्सल भारतीय वेशभुषेत उपस्थित राहून ओबामा यांचे स्वागत केले. त्यानंतर काहीक्षण ओबामा दाम्पत्य आणि मोदी यांच्यात चर्चाही झाली. उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ओबामा हे प्रमुख पाहुणे असतील. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि ओबामा यांच्यात चर्चाही होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ओबामांच्या स्वागताचे PHOTO