आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल बहादूर शास्त्रींसोबतची ही व्‍यक्‍ती नेताजी सुभाष चंद्र बोस असल्‍याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नेताजी सुभाष चंद्र बोस यांना मृत घोषित केल्‍यानंतर 21 वर्षांनंतरच्‍या एका फोटोवरून ब्रिटिश एक्सपर्ट नील मिलर यांनी दावा केला की या फोटोमध्‍ये दिसणारी व्‍यक्‍ती ही नेताजीसारखी दिसते. हा फोटो 1966 मधील आहे. पुर्वीच्‍या सोव्हियत रशियातील ताश्कंद शहरातील हा फोटो आहे. त्‍यामध्‍ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्‍त्री यांच्‍यामागे नेताजींसारखी व्‍यक्‍ती उभी दिसत आहे.
फोटोमध्‍ये नेताजींच्या उपस्‍थितीचा दावा
- या फोटोबाबत दावा केला की, माजी पंतप्रधान शास्‍त्री यांच्‍या मागे असलेली व्‍यक्‍ती ही नेताजींसारखी दिसत आहे.
- ही व्‍यक्‍ती नेताजी सुभाष चंद्र बोस असू शकते, असे ब्रिटिश एक्सपर्टचे मत आहे.
- नेताजींबाबत संशोधन करत असलेले ब्रिटिश एक्सपर्ट नील मिलर यांनी फॉरेंसिक टूल्टचा वापर करून फेस मॅपिंग तंत्र अवलंबून फोटो ओळखला आहे.
- तैवानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात होऊन 18 ऑगस्‍ट, 1945 मृत्‍यू झाला असे मानले जाते. तर, लाल बहादूर शास्त्री यांचे निधन ताश्कंद दौ-याच्‍या दरम्‍यान 11 जानेवारी, 1966 मध्‍ये झाले होते.
फोटो खरा निघाला तर, काय होईल ?
ब्रिटिश एक्सपर्टने केलेल्‍या दाव्‍यानुसार हा फोटो खरा निघाला तर, दोन गोष्‍टी सिद्ध होतील.
- नेताजी यांचे निधन 1945 मध्‍ये विमान अपघातात झाले नव्‍हते.
- रशियन नेता स्‍टॅलिनने 1950 च्‍या सुरूवातीला नेताजींची हत्‍या केली होती. हे खोटे ठरेल.
संजय नाथ सिंह यांचा दावा
- लाल बहादूर शास्त्री यांचे नातू संजय नाथ सिंह यांचा दावा आहे की, शास्त्रींनी मृत्‍यूच्‍या आधी सुमारे तासभर आधी फोनवर कुणाशी संवाद साधला होता. त्‍यांनी त्‍या व्‍यक्‍तीला सांगितले होते की, ते भारतात आल्‍यावर एक मोठा खुलासा करणार आहेत. शास्‍त्री यांच्‍या निधनाच्‍या वेळी संजय नाथ सिंह हे 9 वर्षांचे होते.
रिपोर्टनुसार - व्‍हिडिओ आणि फोटोची तुलना केली असता, ताश्‍कंदमध्‍ये शास्‍त्रींच्‍या मागे उभी असलेली व्‍यक्‍ती आणि नेताजी या दोन्‍ही व्‍यक्‍ती एकच आहेत.

- या रिपोर्टनंतर नेताजींच्‍या समर्थकांनी फोटोमधील व्‍यक्‍तीची ओळख पटवण्‍यासाठी सरकारला उत्‍तर मागितले. आपल्‍याकडे कोणतेही उत्‍तर नसल्‍याचे सरकारचे म्‍हणने आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...