आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Eric Lafforgue Took The \'banned\' Images In North Korea

\'गुढ देश\' उत्तर कोरियावर आहे जगाचे लक्ष्य, हे आहेत 24 BANNED PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाची जीवन शैली जगासमोर येऊ नये म्हणून या फोटोंवर बंदी घालण्यात आली होती. - Divya Marathi
उत्तर कोरियाची जीवन शैली जगासमोर येऊ नये म्हणून या फोटोंवर बंदी घालण्यात आली होती.
नवी दिल्ली - आज आम्ही तुमच्यासाठी कायम आपल्या भोवती संशयाचे वलय निर्माण करणाऱ्या गुढ उत्तर कोरियाचे असे फोटो घेऊन आलो आहोत, जे BAN केलेले होते. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर एरिक लॅफोर्गने जेव्हा हे फोटोज् क्लिक केले होते, तेव्हा स्थानिक प्रशासनाने त्यांना ते डिलिट करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर एरिक यांना पुन्हा देशात पाऊल ठेवण्यास बंदी घातली गेली.

आज या फोटोंचे महत्त्व का
उत्तर कोरियाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे. त्यासोबतच उत्तर आणि दक्षिण कोरियामधील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्र परिषदेने (यूएन) तातडीची बैठक बोलावली आहे. संयुक्त राष्ट्राच्या या बैठकीत जगभरातील देशांनी उत्तर कोरियासोबत कसे संबंध ठेवावे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोणत्या प्रकारच्या फोटोंवर लावण्यात आली होती बंदी
एरिकने उत्तर कोरियाच्या सामान्य लोकांची जीवनशैली कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या छायाचित्रांना डिलिट करण्याचा आदेश देण्यात आला. यावरुन स्पष्ट झाले की कोरियाला आपल्या अंतर्गत घटनांबद्दल जगाला काहीही कळू द्यायची इच्छा नाही. फोटोंमध्ये उत्तर कोरियाचे सैनिक, उपासमार आणि गरीब मुले, बालमजुरीसह अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासनाच्या दबावानंतरही फोटोग्राफर एरिक कसेतरी काही फोटो मेमरी कार्डमध्ये सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झाले होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुढ देश उत्तर कोरियाचे आणखी PHOTOS....