आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोफेशनल फोटोग्राफरने दाखवली रेप अटेम्प्टची शिकार झालेल्या तरुणीची Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनिरिका हिला बालपणी फूले आवडायची. दिवसभरात तिचा सर्वात जास्त वेळ फुलझाडांच्या देखरेखीत जात असे. - Divya Marathi
तनिरिका हिला बालपणी फूले आवडायची. दिवसभरात तिचा सर्वात जास्त वेळ फुलझाडांच्या देखरेखीत जात असे.
नवी दिल्ली- चेन्नईचे प्रोफेशनल फोटोग्राफर गणेश टोस्‍टी यांनी आपल्या 'फिक्शनल फोटो सीरीज'मधून भारतात महिलांवर होणार अत्याचार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये अलिकडे प्रचंड वाढ झाली आहे. या घटना घडण्यामागे नेमके काय कारण आहे? हे दाखवण्याचा गणेश टोस्टी यांचा मूूळ उद्देश आहे.

ही‍ कहाणी तनिरिका नामक एका तरुणीची आहे. काही नराधमांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता.

चला तर मग जाणून घेऊया तनिरिकाची कहाणी...
- टोस्‍टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारतात दररोज कुठे ना कुठे बलात्काराची घटना घडते. तीन वर्षाच्या मुलीपासून वयोवृद्ध महिलांवर अत्याचार केला जातो.
- टोस्टी यांच्या मते, महिला कशा राहातात, काय परिधान करतात, यामुळे महिलांवर बलात्कार होत नाही तर मानवता हरवत असल्याने हे प्रकार होत आहेत. याविषयी टोस्टी यांनी या फोटो सीरीजमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- फोटो सीरीजमध्ये एक तरुण तनिरिकाच्या मदतीला धावून येतो. नराधमांच्या तावडीतून तिची सुटका करतो. शेवटच्या फोटोत तनिरिकाचे विचार आहेत. सीरीजमधील प्रत्येक फोटो मागे एक कहाणी लपली आहे.
तनिरिकाने शेअर केले, बालपण ते तारुण्याचे अनुभव...

#1. बालपणीची आठवण...
- बलात्काराचा प्रयत्न झाल्यानंतर तनिरिका तिच्या वडीलांना (अप्पा) भेटते. तिला तिचे बालपण आठवते. तिच्यासमोर बालपणी घडलेला किस्सा उभा राहातो. ती एके दिवशी घराबाहेर खेळत असते.
- तनिरिका खेळता खेळता पाय घसरुन जमिनीवर पडते. तिच्या चेहर्‍यावर खरचटते. वेदनेने विव्हळणार्‍या तनिरिकाकडे अप्‍पा धावतच येतात. तिला कवेत घेतात. अश्रु पुसतात. हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात.
- डॉक्टर डोक्यावरील जखमेवर मलमपट्टी करतात. जेव्हा ती आरशासमोर जाते आणि चेहर्‍यावरील जखम पाहून, खूप रडते. अप्‍पा पुन्हा धावतच तिच्याकडे येतात. ती अप्पांना
विचारते जखमेचे व्रण तसेच राहातील काय...?
- अप्‍पा हसतच तिला उचलून घेतात आणि म्हणतात, 'घाबरु नकोस. यांना ‘दाग’ म्हणतात. ही बॉयलोजिकल प्रोसेस आहे. उपचारानंतर जखम भरून निघेल आणि दागही कायमचे नाहिसे होतील.'
- दुसर्‍या दिवशी मी जेव्हा तनिरिका लॉनवर जाते. तिने काही लगड पडलेले दिसतात. ती एक-एक करून ते उचलते आणि लांब फेकते.
- अप्पाने मला दगड उचलताना पाहिले. त्यांनी मला बोलावले. ते म्हणाले, तु पडली, ह दगडांची चूक नाही.
- दगड हे निर्जिव असतात. पृथ्वीवर ते ठिकठिकाणी विखूरलेले असतात. पण आपण सजीव आहोत. आपणल्याला आपले बरे-वाईट समजते. त्यामुळे नेहमी सजग राहायला हवे.

#2. रेप अटेम्प्टनंतर... काय मी आता पुन्हा उभी राहू शकेल...?
- 'मला आजही आठवते की, माझी बाजू न घेतल्याने मी अप्पांवर प्रचंड रागावली होती. काही दिवसांत डोक्यावरील जखम सावळली. अप्पांनी सांगितल्याप्रमाणा 'दाग'ही नाहिसे झाले होते.
- आता देखील तोच प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला होता. (रेप अटेम्प्टनंतर) परिस्थिती वेगळी होती. चेहर्‍यावर अनेक जखमा आणि चारित्र्यावर दाग लागला होता. काय ही माझी चूक होती? हो, ही माझीच चूक होती. मी जंगलाचा रस्ता निवडला. नराधम तर निर्जिव दगडासारखे तिथेच उभे होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रेप विक्टिम तनिरिकाची कहाणी...
(टीप: सर्व फोटोज सादर करण्यापूर्वी फोटोग्राफर गणेश टोस्टी यांची परवानगी घेतली आहे.)

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...