आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Recreated The Delhi Gangrape As A Glossy Fashion Shoot On A Bus

फॅशन फोटोशूटमध्ये दिसली दिल्‍ली गॅंगरेपची झलक, राज शेट्टी यांचा \'रॉंग टर्न\'?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून टाकणार्‍या दिल्ली गॅंगरेपशी संबंधित एक फॅशन फोटोशूट झळकल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील फोटोग्राफर राज शेट्टी यांनी ''द रॉंग टर्न'' या शिर्षकाखाली 'फॅशन फोटोशूट' केले आहे. सध्या हा फोटोशूट वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

राज शेट्टी यांच्या फॅशन फोटोशूटमध्ये एका बसमध्ये काही पुरुष मॉडेल एका महिला मॉडेलवर सामू‍हीक अत्याचार करताना दाखवले आहे. शेट्‍टी यांचा फोटोशूट अतिशय खालच्या दर्जाचा असून तो समाजाच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे, अशा तिखट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

दरम्यान, फोटोशूट दिल्लीतील 16 डिसेंबरच्या घटनेवर आधारित नसल्याचे फोटोग्राफर राज शेट्टी यांनी स्वत:चा बचाव करताना म्हटले आहे. देशातील महिला किती असुरक्षित आहेत, याकडे लक्ष वेधण्याचा मूळ उद्देश असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

वादग्रस्त फोटोशूट...
फॅशन फोटोग्राफर राज शेट्टी यांच्या फोटोशूटमध्ये एक महिला मॉडेलवर दोन पुरुष अत्याचार करताना दिसत आहेत. महिला मॉडेल अब्रु वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या फोटोमध्ये मॉडेल जितिन गुलाटी, पूजा मोर आणि आणखी एक पुरुष मॉडेल आहे.

सोशल मीडियावर उडाली खळबळ...
राज शेट्टी यांचे वादग्रस्त फोटोशूट 'टि्वटर' आणि 'फेसबुक'वर झळकल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. यावर सामान्य युजर्ससह संगीतकार विशाल डडलानी यांनीही तिखट टिप्पणी नोंदवली आहे. शेट्टी यांचे फोटोशूट अतिशय खालच्या दर्जाचे आहे. यामुळे समाजाची मानसिकता ढासाळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही डडलानी यांनी म्हटले आहे.

फोटोग्राफरने दिले स्पष्टीकरण...
राज शेट्टी यांनी आपल्या 'फेसबुक पेज'वर याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. शेट्टी यांनी लिहिले आहे की, फोटोशूटद्वारे मी देशातील पुरुषप्रधान संस्कृतीला इशारा दिला आहे. वास्तविक या फोटोशूटमध्ये महिला सबलिकरणावर जोर देण्याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. भारतातील महिला किती असुरक्षित आहेत, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यात मला काहीही चुकीचे आढळले नाहीत. ही छायाचित्रे 16 डिसेंबरच्या दिल्ली गँगरेपावर आधारित नाही.
या छायाचित्राच्या माध्यमातून महिला तसेच समाजात जागरूकता निर्माण करण्‍याचा माझा मूळ उद्देश आहे. भारतात एखाद्या महिलेने एकटीने प्रवास करणे किती असुरक्षित आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचे राज शेट्टी यांनी सांगितले आहे.

आक्षेपार्ह्य टॅगिंग...
राज शेट्‍टी यांच्या फॅशन फोटोशूटमधील कथित फोटो वेबसाइट ''Behance''वर अपलोड करण्‍यात आले आहेत. त्यात हॉट, सेक्सी, मेल, रिवेंज, किडनॅप, लव्ह यासारखे आक्षेपार्ह्य टॅग देण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, वादग्रस्त फोटोशूटमधील फोटोज् तसेच 'टि्वटर'वर उमटलेल्या प्रतिक्रिया...

(फोटोः दिल्‍ली गॅंगरेपशी मिळता जुळता फोटोशूट)