आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणाक्षणाला बदलतेय उत्‍तराखंडची परिस्थिती अन् पुढारी राजकारणात दंग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तरभारतात आलेल्या विनाशकारी महाप्रलयाने रौद्र रुप धारण केले आहे. ढगफुटी झाल्यामुळे मंदाकिनी नदीला आलेल्या महापुरात केदारनाथसह संपूर्ण परिसर उद्‍ध्वस्त झाला असून केदारनाथाचे मुख्य मंदिर तेवढे वाचले आहे. प्रवेशद्वारासह परिसरातील 40 हॉटेल आणि सुमारे दीडशे दुकाने गाळात रुतली आहेत. हजारावर लोकांचा ठावठिकाणा नाही. खेचरावर प्रवाशांना वाहून नेणारे 700 लोकही बेपत्ता आहेत. प्रशासनाने 200 लोक मृत्युमुखी, तर 500 बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. परंतु भाजपच्या लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्‍वराज यांनी 1000 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा आरोप लावला आहे. तसेच सरकारचे बचाव कार्याकडे लक्ष नसल्याचेही म्हटले आहे.

'उत्‍तराखंडमध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले असून सरकारचे बचाव कार्याकडे लक्ष नाही. केदारनाथसह परिसर पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाला असून देखील सारे काही अलबेल असल्याचा दावा सरकार करत आहे.' असे सुषमा यांनी टि्‍वट केले आहे.

केदारनाथची परिस्थिती फारच भयानक असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सांगितले आहे. शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे नुकसानाचा अंदाज वर्तवणे देखील कठीण असल्याचे बहुगुणा यांनी सांगितले आहे. रुद्रप्रयागमध्ये तर खचलेले रस्ते आणि कोसळलेल्या दरडींमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे मोठ्यासंख्येने वाहने अडकली आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्‍तराखंडमधील पीडितांसाठी 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्‍य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची पाच कोटी, हरियाणाचे सीएम भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी महाप्रलयामुळे झालेल्या नुकसानावर चिंतन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे 12 चमू उत्तराखंडात रवाना झाले आहे. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तराखंड आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरध्वनिवरून चर्चा केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये... उत्तराखंडसह हिमाचल, हरियाणा आणि यूपीत महाप्रलयाचा तांडव पाहा छायाचित्रातून..