आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य साईंच्‍या निधनानंतर रडला होता सचिन, मोदींसह हे आहेत VIP भक्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सत्य साईबाबा यांचा जगभरातील भक्‍त परिवार मोठा आहे. त्‍यांच्‍या निधनानंतर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत त्‍याच्‍या पार्थिवाजवळ उशीरापर्यंत बसून रडत होते. सत्‍य साईबाबा यांच्‍या व्हीआयपी भक्‍तांची यादी मोठी आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह, माजी राष्‍ट्रपती अब्दुल कलाम, गुजरातचे तत्‍कालिन मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे अशोक सिंधल यांच्‍यासह आरएसएसचे नेते सत्‍य साईबाबा यांच्‍या दरबारात जात होते.
सत्य साईबाबा यांना शिर्डीच्‍या साईबाबांचा अवतार मानले जाते. त्‍यांचा जन्‍म आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी या गावात 23 नोव्‍हेंबर 1926 मध्‍ये झाला होता. संपुर्ण जगभरात त्‍यांचे अनुयायी आहेत. 24 एप्रिल 2011 मध्‍ये त्‍यांचे निधन झाले होते. लहानपणी त्‍यांची ओळख सत्यनारायण राजू नावाने होती. 20 ऑक्‍टोंबर 1940 मध्‍ये त्‍यांनी स्‍वत:ला शिर्डीच्‍या साईबाबांचा अवतार सांगितले. सत्‍य साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने देशभरातील गरजू लोकांसाठी विविध सेवा योजना राबवण्‍यात येतात. त्‍यापैकी सुपर स्‍पेशालिटी हॉस्‍पिटल प्रमुख आहे. यामध्‍ये सर्व प्रकारच्‍या सर्जरी विनामुल्‍य करण्‍यात येतात.
सचिनची आई साईभक्‍त
हैदराबादमध्‍ये सचिनने बाबांच्‍या निधनाची बातमी ऐकून हॉटेलच्‍या खोलीत स्‍वत:ला कोंडून घेतले होते. सचिनच्‍या आईदेखिल साईबाबांच्‍या भक्‍त आहेत. त्‍यामुळे सचिनचीही त्‍यांच्‍यावर श्रद्धा होती. सचिनला काही अडचण असल्‍यास तो सत्‍य साईबाबा यांची भेट घेत असे. क्रिकेटर सुनील गावस्करने साईबाबांशी सचिनची ओळख करून दिली होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सत्‍य साईबाबांच्‍या व्‍हीआयपी भक्‍तपरिवारात होते हे राजकीय पुढारी, क्रिकेटर्स..