आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळीकडे मृतदेहांचे खच.. फाळणीच्या वेळेचे हे फोटो पाहून आपोआप येईल रडायला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक मृतदेह ढिगाऱ्यांखाली दबलेले नंतर समोर आले. - Divya Marathi
अनेक मृतदेह ढिगाऱ्यांखाली दबलेले नंतर समोर आले.
भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान झालेल्या हिंसाचारात लाखो निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. सीमेच्या दोन्ही बाजुला मृतदेहांचे खच पडलेले होते. कोट्यवधी लोकांना त्यांची घरे सोडून जावे लागले होते. फाळणीच्या याच घटनेवर आणि प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्या कथेवर केतन मेहता यांचा 'टोबा टेक सिंग'नावाचा चित्रपट येत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जाणून घ्या या किती भयावह होती ही घटना..
कोट्यवधी बेघर..
- या फाळणीत सुमारे 2.5 कोटी लोकांना घर सोडावे लागले होते.
- या दरम्यान उसळलेल्या दंगलींमध्ये 5 लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले होते.
- ब्रिटीश सरकारने फाळणीची प्रक्रिया योग्यरित्या हाताळली नसल्याचे म्हटले जाते.
- देशात शांतता कायम राहावी याची जबाबदारी भारत आणि पाकिस्तानच्या नव्या सरकारवर आली.
- पम त्यावेळी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडे काहीही व्यवस्था नव्हती.
- कोट्यवधी लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातील असा विचारही कोणी केला नव्हता.
- परिणामी मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या.

सगळीकडे होते भीतीदायक वातावरण..
- एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना लोकांवर हल्ला करण्यात आला.
- लोकांना सामानही सोबत घेता आले नाही. सर्वकाही सोडून लोक निघून गेले.
- ज्या स्थितीत होते, तसेच कुटुंबाला घेऊन लोक निघाले.
- या दरम्यान झालेल्या हिंसाचाराने सगळीकडे मृतदेहांचे खच होते.
- जेव्हा रेल्वे एका ठिकाणाहून दुसरीकडे जायच्या त्यावेळी त्यात मोठ्या प्रमाणावर मृतदेहच असायचे असे सांगितले जाते.
- या दरम्यान अनेक मुलींचे अपहरण, बलात्कार झाल्याच्या बातम्याही येतच होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फाळणीचे भयावर चित्र दाखवणारे काही PHOTOS पण हे फोटो पाहून तुम्ही विचलित होऊ शकता..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...