आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photoshopped Bullet Train In India Pic Viral On Social Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी फॅन्सनी फोटोशॉपच्या मदतीने चालवली बुलेट ट्रेन, सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविले होते. हे स्वप्न 'सत्यात' उतरल्याचे रविवारी सोशल मीडियावर पाहायला मिळाले. सोशल मीडियावर रविवारी भारतातील एका रेल्वेस्टेशनवर बुलेट ट्रेन उभी असल्याचे छायाचित्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. हे छायाचित्र शेअर करणार्‍या युजर्सने दावा केला, की गुजरातमधील बिलिमोरा स्टेशनवर बुलेट ट्रेनची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर युजर्सनी 'या यशा'साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन देखील केले. मात्र, थोड्याच वेळात या छायाचित्राचे सत्य समोर आले.
एका युजरने फोटोशॉपच्या मदतीने तयार केलेल्या छायाचित्रासह रेल्वेस्टेशनचे खरे छायाचित्र शेअर केले. त्यात फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतातील पारंपरिक रेल्वेच्या जागी लंडनमधील अत्याधुनिक ट्रेनचे छायाचित्र लावण्यात आले होते. हे कळाल्यानंतर युजर्सनी ही खोटी छायाचित्रे अपलोड करणार्‍यावर जोरदार निशाणा साधला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, खरे छायाचित्र शेअर करुन सोशल मीडिया युजरने केलेली पोलखोल आणि वाचा, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया