आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजियोथेरपीच्या विद्यार्थिनीवर दिल्लीत सामूहिक अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत फिजिओथेरपीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. पैकी एक आरोपी मुलीच्याच वर्गात होता. त्याने तीन मित्रांसोबत मिळून विवेक विहार या पॉश वसाहतीत तरुणीवर अत्याचार केले.

पोलिसांनी सांगितले की, या मुलांनी पार्टी आयोजित केली होती. आकाश नावाच्या तरुणाने पीडित युवतीला पार्टीसाठी बोलावले. तेथे त्याचे तीन मित्रही होते. त्या सर्वांनी मिळून तिला शस्त्रांचा धाक दाखवून डांबून ठेवले.

चौघांनीही रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. दुसर्‍या दिवशी ते तिला गाडीतून तिच्या घराजवळ टाकून देऊन फरार झाले. घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. मुलीने जखमी अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तीन आरोपींना पकडले असून रमण हा चौथा आरोपी फरार आहे. वैद्यकीय अहवालात अत्याचाराची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी तरुणांच्या महाविद्यालयालाही याची माहिती दिली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.