आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Of Shashi Tharoor Dead Wife Sunanda Pushkar Creamation

ओक्साबोक्शी रडणारा सुनंदा यांचा मुलगा शिवला शशी थरुर यांनी सावरले, पाहा छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मणुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर शनिवारी पंचत्वात विलिन झाल्या. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधीरोड स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा शिव मेनन याने चितेला मुखाग्नी दिला. आईला अखेरचा निरोप देताना शिवला भावना आवरणे कठीण झाले होते. तो ओक्साबोक्शी रडत होता, तर शशी थरुर त्याला सावरण्याचा प्रयत्न करीत होते.
अंत्यसंस्कारावेळी शशी थरुर यांच्यासह सुनंदा यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्याआधी 'एम्स' मध्ये केंद्रीय मंत्री थरुर यांच्या सांत्वनासाठी अनेक राजकीय नेते येऊन गेले. एम्समध्ये सुनंदा यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले आणि तेथून स्मशानभूमीत.
शुक्रावारी चाणक्यपूरी येथील हॉटेल लिलामध्ये सुनंदा यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत आढळला होता. ते दृष्य पाहून थरुर यांना धक्का बसला होता. शनिवारी पहाटे थरूर यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यावर ‘एम्स’मध्ये आयसीयूत दाखल करण्यात आले. दुपारनंतर त्यांना सुटी देण्यात आली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत छायाचित्रे