आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Of Sunanda Pushkar After Her Death Came Out

सुनंदा पुष्‍कर यांच्या मृतदेहावर होत्या अनेक जखमा; पहिल्यांदाच समोर आले हे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचे मृत्यूनंतरचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. इंग्रजी वृत्तपत्र 'मेल टुडे'मध्ये हे फोटो प्रकाशित झाले असून टीव्ही चॅनल 'हेडलाईन्स'ने ते जाहीर केले आहेत.

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू 17 जानेवारी, 2014 रोजी झाला. दिल्लीतील चाणक्यपुरी भागातील लीला पॅलेस हॉटेलच्या रूम नंबर 345 मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या हॉटेलमध्ये एक दिवस अगोदरच शशी थरूर यांनी चेक इन केले होते. घराच्या नुतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो, असे शशी थरूर यांनी सांगितले होते.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला त्यादिवशी दोन व्यक्ती त्यांच्या रुममध्ये दाखल झाल्या होत्या. त्या दोघांनी रुममध्ये असलेल्या कॅमेऱ्यातील पुरावे नष्ट केले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून बघा, सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहाचे पहिल्यांदाच समोर आलेले फोटो...