आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कमळ’ राष्ट्रीय फूल भाजपचे चिन्ह कसे?, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कमळ हे राष्ट्रीय फूल असून ते एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह म्हणून वापरले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद करत ‘कमळ’ हे भाजपचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
भाजपकडून राष्ट्रीय फुलाचा (कमळ) निवडणुकीच्या उद्देशाने वापर केला जात असून त्यामुळे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायदा- १९५० भंग होतो, असा दावा याचिकेत आहे. कमळ हे पवित्र फूल आहे. प्राचीन भारतीय कला व पुराणात त्याला मोठे महत्त्व आहे. संपत्ती, समृद्धीचे प्रतीक लक्ष्मी आहे आणि कमळ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, असे हेमंत पाटील यांच्या याचिकेत म्हटले आहे. कमळ हे समृद्धी, दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. त्यामुळे या प्रतीकाचा कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक उद्देशासाठी वापर केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.

करण्यात आला आहे. २५ वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने भाजपला कमळ हे निवडणूक चिन्ह दिले. ते रद्द करावे म्हणून आपण निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने आपणाला न्यायालयात यावे लागले, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...