आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pilots Don't Know How To Fly With Tejas Aircraft, Which Replaces MIG 21

हवाईदलाला 'तेजस' मिळाले पण उडवायचे कसे ते सांगितलेच नाही? संरक्षण मंत्र्यांची डेडलाईन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीस वर्षे वाट पाहिल्यानंतर भारतीय हवाईदलाला पूर्ण स्वदेशी बनावटीचे तेजस हे लढाऊ विमान मिळाले. पण अजूनही हवाईदलातील अनेक पायलट्सना हे विमान कसे उडवायचे याबाबत माहिती नाही. त्याचबरोबर त्याची देखभाल कशी ठेवायची (Maintanence) याबाबतही त्यांना काहीही माहिती नाही. पण संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मात्र आता त्यासाठी एका महिन्याची डेडलाइन ठरवून दिली आहे.
फोटो - तेजस विमान

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे. गेल्या महिन्यात ते भारतीय हवाईदलाकडे सुपूर्द करण्यात आले. रशियाची निर्मिती असलेल्या मिग-21 विमानांच्या जागी तेजस वापरले जाणार आहेत. गेल्या काही वर्षात हवाईदलातील सुमारे अर्धी मिग विमाने दुर्घटनाग्रस्त झाली होती. 2017 मध्ये या विमानांचा वापर थांबवला जाणार होता. पण तेजस विमानांच्या पुरवठ्यासाठी लागणाऱ्या उशीरामुळे या विमानांची डेडलाईन 2025 पर्यंत वाढवली आहे.

तेजसला हवाईदलात सहभागी करून घेतले असले तरी इतर देशांकडे असलेल्या लढाऊ विमानांच्या तुलनेत तेजस बऱ्याच प्रमाणात कमकुवत आहे. उड्डाण सुरू असताना हवेत इंधन भरणे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेणे असे तंत्रज्ञान अद्याप या विमानात नाहीत. तसेच पायलना अद्याप त्याचे मॅन्युअलही देण्यात आलेले नाही. त्यामुळेच दीर्घ अनुभव असलेले पायलटच तेजची सफर करू शकतात.

2011 मध्ये एअर चीफ मार्शलने व्यक्त केली होती चिंता
2011 मध्ये तत्कालीन हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल पीव्ही नायक म्हणाले होते की, जोपर्यंत हे विमान पूर्णपणे आमच्या वापरण्यायोग्य होत नाही, तोवर आम्ही ते सैनिकांच्या हाती देणार नाही. त्यावेळी तेजसला पहिले ऑपरेशनल क्लिअरंस मिळाले होते. सरकारला भारतीय लष्करात 170 तेजस विमाने सहभागी करून घ्यायची आहेत.
तेजसची वैशिष्ट्ये
वजन12 टन
लंबाई13.2 मीटर
उंची4.4 मीटर
पंखांचा पसर8.2 मीटर
स्पीडताशी 1350 किमी
कारवाईचा परीघ400 किमी इंधन न भरता
पुढील स्लाइडवर जाणून घ्या तेजसविषयी काही रंजक माहिती...