आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींनंतर प्रथमच देशाचे संरक्षण स्त्रीशक्तीकडे; एकाच वेळी चार माजी नोकरशहा मंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी रविवारी मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार करत ९ नव्या मंत्र्यांचा समावेश केला. निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान व मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती आणि महत्त्वाची जबाबदारीही सोपवली. 

निर्मला सीतारमण यांना संरक्षणमंत्रिपद देत माेदींनी नेहमीप्रमाणे याही वेळी चकित केले. प्रथमच देशाला पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री लाभल्या. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना हे खाते स्वत:कडे ठेवले होते. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती, मनोहर पर्रीकरांची गोवा वापसी व अनिल दवे यांच्या निधनानंतर ३ मंत्रिपदे रिक्त होती. तसेच विस्ताराआधी ६ मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. प्रथमच एकाच वेळी चार नोकरशहांना मंत्रिपद दिले गेले. यापैकी दोघे तर खासदारही नाहीत. १६ मंत्र्यांची खाती बदलली. प्रभूंना वाणिज्य, गोयल यांना रेल्वेखाते सोपवले. गंगा स्वच्छतेची जबाबदारी उमा भारतींकडून गडकरींकडे सोपवली आहे. 
 
ठळक....
- प्रभू, उमा भारतींसह १६ मंत्र्यांची खाती बदलली, सहा जणांना अर्धचंद्र.
- नव्या मंत्र्यांत यूपी-बिहारचे २-२, राजस्थान, मप्र, केरळ, कर्नाटक व दिल्लीतून प्रत्येकी एक.
- १३ मंत्र्यांनी घेतली शपथ, यात ९ नवे राज्यमंत्री, ४ जणांना कॅबिनेटपदी बढती.
- निर्मला सीतारमण संरक्षणमंत्री, ३५ वर्षांपूर्वी  तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी संरक्षणमंत्रिपद स्वत:कडे ठेवले होते.
- प्रथमच एका वेळी चार माजी नोकरशहा मंत्री झाले.

प्रोटोकॉलमध्ये जेटली, सुषमांपेक्षाही निर्मला झाल्या ज्येष्ठ, द. भारतात पाय रोवता येतील
निवडीची २ कारणे :
पहिले - महिलांसाठी संदेश. टॉप-४ मंत्रालयांत (गृह, अर्थ, विदेश, संरक्षण) प्रथमच सुषमा व निर्मला या दोन महिला. संरक्षणमंत्री म्हणून निर्मला कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या सदस्य असतील. पीएम व गृहमंत्र्यांच्या अनुपस्थिती संरक्षणमंत्री कॅबिनेट बैठक घेतात. यामुळे निर्मला यांचे राजकीय वजन जेटली व सुषमांपेक्षा जास्त. दुसरे - निर्मला तामिळनाडूत जन्मल्या, आंध्रात लग्न आणि कर्नाटकातून राज्यसभा खासदार. नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्या द. भारतात भाजपचा चेहरा बनू शकतात.

येत्या वर्षभरात १० राज्यांत निवडणुका; ३ राज्यांतून प्रत्येकी १़
 
राजस्थान मध्ये राजपूत तर एमपीत दलितांना जोडणे
२०१८ पर्यंत १० राज्यांत निवडणुका होतील. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकातूनच मंत्री नेमले. गजेंद्रसिंह शेखावत मारवाडचे चौथे मंत्री आहेत. येथील १० % राजपुतांना जोडण्याचा हा प्रयत्न आहे. एमपीचे वीरेंद्रकुमार दलित. गेल्या निवडणुकीत ४७% दलितांनी भाजपला मते दिली. कर्नाटकच्या अनंतकुमार हेगडेंचा ७० ब्राह्मणबहुल जागांवर प्रभाव आहे.

यूपी-बिहार मध्ये सवर्ण जातींना प्राधान्यक्रम देणे
पश्चिम यूपीचे जाट नेते संजीव बलियान यांच्या जागी त्याच समाजाचे सत्यपालसिंह यांना आणले. तेथील लोकसभेच्या १२ जागा जाट ठरवतात. पूर्व यूपीचे शिवप्रताप शुक्ल ब्राह्मण असून तिथे १०% ब्राह्मण मते आहेत. बिहारच्या राजीवप्रताप रुडी यांच्याऐवजी आर.पी. सिंह (ठाकूर) व अश्विनी चौबे (ब्राह्मण) यांना आणले आहे. २३% मतदार सवर्ण आहेत.

उर्वरित नावे जी २०१९ आधी  फायदा मिळवून देतील
पीयूष गोयल व धर्मेंद्र प्रधानांनी चांगले काम केले. गावात वीज व महिलांना स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याच्या मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम दोघांकडे होते. गोयल यांच्याकडे आता रेल्वे मंत्रालय आले. प्रभूंच्या २ वर्षांत २८अपघात व २७७ बळींमुळे खाते रूळावरून घसरले. ते २०१९ पूर्वी रुळावर आणावे लागेल. सरकार कर्तव्यदक्ष दिसावे हा यामागचा प्रयत्न आहे.

शिवसेना, जदयूला ठेंगा
विस्तारात एकाही घटक पक्षाला संधी मिळाली नाही. जदयूशी आघाडी करून बिहारमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर नव्या विस्तारात जदयूला किमान २ मंत्रिपदे दिली जातील, असे मानले जात होते. अण्णाद्रमुक व शिवसेनेलाही प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात हा विस्तार भाजपपुरताच मर्यादित राहिला.

ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटलीत महिलांकडे संरक्षणमंत्रिपद
पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या संरक्षण क्षेत्रात १५ देशांमध्ये महिलांनी संरक्षण मंत्रिपद भूषवले. मात्र, या देशांच्या सीमा भारताइतक्या असुरक्षित नाहीत. यात ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, केनिया, अल्बानिया, नाॅर्वे, बांगलादेश यांचा समावेश आहे.
- उर्सुला वॉन डेर लेयेन, जर्मनी 
- मेरिस पेन, ऑस्ट्रेलिया 
- मारिया डोलोरेस डे, स्पेन 
- रोबर्टा पिनोटी, इटली 
- जेनी हेन्निस, नेदरलँड 
- फ्लोरेन्स पार्ली, फ्रान्स

१० राज्यांतून १-१ मंत्री : गोवा, आेिडशा, उत्तराखंड, तामिळनाडू, छग, अासाम, केरळ, हिमाचल, अरुणाचल, जम्मू-काश्मीर.
या राज्यांतून एकही मंत्री नाही : मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, तेलंगण, त्रिपुरा.
 
कुणाला कोणते मंत्रालय?
>> संरक्षण मंत्री - निर्मला सीतारमण
>> रेल्वे मंत्री - पीयूष गोयल
>> क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय - राज्यवर्धन सिंह राठोड (स्वतंत्र प्रभार)
>> क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय - विजय गोयल (राज्यमंत्री)
>> ऊर्जा मंत्री - राजकुमार सिंह (स्वतंत्र प्रभार)
>> पर्यटण / माहिती तंत्रज्ञान मंत्री- अल्फोन्स कन्ननथानम (राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार)
>> स्किल डेव्हलपमेंट मंत्री - धर्मेंद्र प्रधान
>> पेयजल आणि स्वच्छता मंत्री - उमा भारती
>> जल संपदा / गंगा संरक्षण मंत्री - नितीन गडकरी
>> शहर विकास मंत्रालय - हरदीप पुरी (राज्यमंत्री)
>> उत्खनन मंत्री - नरेंद्र सिंह तोमर
>> संसदीय कामकाज मंत्री - विजय गोयल (राज्यमंत्री)
>> आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री - अश्विनी कुमार चौबे (राज्यमंत्री)
>> स्किल डेव्हलपमेंट मंत्री - अनंत कुमार हेगडे (स्वतंत्र प्रभार)
>> वाणिज्य आणि उद्योग मंत्री - सुरेश प्रभू
 
कॅबिनेटसाठी प्रोमोट झालेले मंत्री
- मुख्तार अब्बास नकवी
- निर्मला सीतारामण
- पीयूष गोयल
- धर्मेंद्र प्रधान
 
शपथ घेतलेले राज्यमंत्री 
- माजी आयएएस अल्फोन्स कन्ननथानम
- खासदार आणि माजी IPS सत्यपाल सिंह
- राजस्थानचे खासदार गजेंद्र सिंह चौहान
- माजी आयएफएस अधिकारी हरदीप पुरी
- माजी आयएएस राजकुमार सिंह
- अनंत कुमार हेगडे
- वीरेंद्र कुमार
- अश्विनी कुमार चौबे
- शिवप्रताप शुक्ल
 
मंत्रिमंडळ फेरबदल या वेळी दिली ज्येष्ठांना संधी

पहिला फेरबदल: २१ नवे चेहरे, १० जणांचे वय ६० वर्षांवर, सरासरी वय ५७ वर्षे.
नोव्हेंबर २०१४ मध्ये २१ नव्या चेहऱ्यांचा समावेश. त्यात १ महिला होती. १० मंत्री ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. ४ मंत्री ५० ते ६० वयोगटातील होते. इतर ४० वर्षांखालील होते.
- मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू अनपेक्षित चेहरे होते.

दुसरा फेरबदल : ५ मंत्र्यांचे राजीनामे घेतले, निवडणूक होणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित
विस्ताराआधी पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले. १९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. १९ पैकी सर्वाधिक ४ राजस्थानचे. उप्र, मप्र, गुजरातचे ३-३ मंत्री. मंत्र्यांची संख्या ७८ झाली.
- प्रकाश जावडेकरांना कॅबिनेट मंत्री करून धक्का.

तिसरा फेरबदल : ४ नोकरशहांचा मंत्रिमंडळात समावेश, या नव्या गटाचे सरासरी वय ६०.४४ वर्षे
विस्ताराआधी ६ मंत्र्यांचा राजीनामा घेतला. ९ नवे चेहरे आले. त्यात चार माजी नोकरशहांना स्थान दिले. या नव्या गटाचे सरासरी वय ६०.४४ वर्षे. म्हणजे प्रशासकीय अनुभवाला प्राधान्य
- केरळमधून अल्फ्रान्स, हरदीपसिंह ही धक्का देणारी नावे.
 
संबंधित बातम्या...
> निर्मला सीतारमण यांच्याप्रमाणे या महिलाही सांभाळत आहेत त्यांच्या देशाचे संरक्षण मंत्रालय
> 'चहावाला' पंतप्रधान आणि 'पंक्चरवाला' मंत्री, वाचा या केंद्रीय मंत्र्याची कहाणी
> हे आहेत मोदीच्या नव्या कॅबिनेटमधील 9 चेहरे, 4 मंत्री आहेत माजी IAS, IPS, IFS
> INSIDE STORY: मोदींना प्रथमच राजनाथ-सुषमांसह 4 नेत्यांकडून मिळाले आव्हान
> पीयूषना रेल्वे तर निर्मलांना डिफेन्स मंत्रालय : दोघांसमोर असणार ही मोठी आव्हाने
> मोदींकडून प्रमोशन मिळवत बनले कॅबिनेट मंत्री, पण राष्ट्रपतींनी बरोबर पकडली चूक
बातम्या आणखी आहेत...