आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'PK' Cbfc Member Wrote Letter To Govt About Controversial Scenes

PK : सेंसॉर बोर्डातही उमटले होते विरोधी सूर, तरीही प्रदर्शित करण्यात आला चित्रपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सीबीएफसी (सेंसॉर बोर्ड) चे सल्लागार सदस्य सतीश वसंतराव कल्याणकर यांनी मंत्रालयाला पाठवलेले पत्र
नवी दिल्ली - आमीर खानचा चित्रपट ‘PK’ च्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. अनेक संघटनांसह मुस्लीम धर्मगुरुंनीही चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत सेंसॉर बोर्डातच एकमत नसल्याचे समोर आले आहे. सेंसॉर बोर्डाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य सतीश कल्याणकर यांनी या चित्रपटात काही आक्षेपार्ह भाग असल्याचे पत्र माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवले होते. पण तरीही चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली.

सतीश कल्याणकर यांनी पाठवलेल्या पक्षात ‘PK’ चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला होता. या दृश्यांमुळे लोक नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे अडचणी निर्माण होतील असेलची सतीश कल्याणकर यांनी पत्रात म्हटले होते. पण तरीही ही दृष्ये न हटवताच चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

पत्रातील मजकूर काय?
वसंतराव यांनी पत्रात म्हटले होते की, चित्रपट पाहताना काही दृष्य आणि संवादांवर मी आक्षेप नोंदवला होता. पण बहुतांश सदस्य चित्रपटातील दृष्ये वगळण्याबाबत सहमत नव्हते. पण त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा इशारा त्यांनी दिला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PK च्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे PHOTO