आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दिल्लीत 'आम आदमी पार्टी'चे सरकार स्थापन होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नायब राज्यपालांना पुढील प्रक्रीयेसाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर आता रामलीला मैदानावर शपथविधीची तयारी करण्याचे आदेश महानगर पालिकेला देण्यात आले आहेत. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा अतिशय साध्या पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून कोणालाही त्याचे आमंत्रण देण्यात येणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. आमदारांच्या नातेवाईकांनाही सर्वसामान्य लोकांसोबत बसण्यास सांगण्यात आले आहे. परंतु, प्रशासन स्वतःहून आमंत्रण देऊ शकतात, असे पक्षातर्फे मुख्य सचिवांना सांगण्यात आले आहे.
केजरीवाल यांचा शपथविधी 26 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्य सचिव आज सकाळी अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यापूर्वी मुख्य सचिवांनी अधिका-यांची एक बैठकही घेतली. त्यात शपथविधीच्या तयारीसह इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
एकीकडे शपथविधी समारंभाची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावे, याबाबत पक्षाची राजकीय समिती मंथन करत आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी योजनाही तयार आहे. कमी वेळेत मोठे काम करुन दाखविण्याचे आव्हान सध्या केजरीवाल यांच्यासमोर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.