आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा दावा; देशातील गरीबी कमी झाली, 28 रुपये कमाई असणारे सधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नियोजन आयोगाने दावा केला आहे, की गेल्या आठ वर्षात देशातील गरीबी 15.3 टक्क्यांनी कमी झाली आहे. 2004-05 मध्ये गरीबांची संख्या 37.2 टक्के होती, जी 2011-12 या वर्षात कमी होऊन 21.9 टक्क्यांवर आली आहे. 2004-05 मध्ये 40.71 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली होते. 2011-12 मध्ये ही संख्या कमी होऊन आता देशात 26.93 कोटी लोक दारिद्रय रेषे खाली आहेत.
(एनएसएसओने फोडला मोदींच्या विकासाचा फुगा; गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे)

सुरेश तेंडूलकर समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार नियोजन आयोगाने गरीबीची सीमारेषा ठरविली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात 816 रुपये आणि शहरी कुटुंबाचे दर महा उत्पन्न 1000 रुपये असेल तर ते दारिद्रय रेषेच्या वर असतील. या अहवालानुसार शहरातील व्यक्ती 33.33 रुपये आणि ग्रामीण भागातील व्यक्ती 27.20 रुपये दररोज खर्च करीत असेल तर त्यांना गरीब म्हणात येणार नाही.

आयोगाच्या अहवालानुसार 2001-02 मध्ये 25.7 टक्के ग्रामीण आणि 13.7 टक्के शहरी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. 2004-05 या वर्षी ही संख्या अनुक्रमे 41.8 टक्के आणि 25.7 अशी होती.