आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Planning Commission\'s Name Changed To \'Neeti Ayog

नियोजन आयोग आता नीती आयोग, सोमवारी होणार बदलाबाबत अधिकृत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोग करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्लानिंग कमीशन (नियोजन आयोग) ची स्थापना 1950 मध्ये केली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजन आयोगाच्या बदलासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या सर्व राज्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन आठवड्यांपूर्वी ही बैठक झाली होती. समादवादाच्या काळातील या संस्थेमध्ये बदल करण्याची मागणी बहुतांश मुख्यमंत्र्यांनी केली होती. तर काँग्रेसच्या काही मुख्यमंत्र्यांनी नियोजन आयोग सुरू ठेवायची मागणी केली होती.
सोमवारी (29 डिसेंबर) च्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या आयोगाच्या पॅनलचे नाव बदलण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नियोजन आयोगाची प्रासंगिकता संपली आहे. त्यामुळे याची नव्याने बांधनी करण्याची गरज आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही मोदींनी त्याचा उल्लेख केला होता.


केंद्राच्या या निर्णयाला काँग्रेसकडून मात्र तीव्र विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणाले की, सरकारच्या या निर्णयाचा काही खास उद्देश नाही. तृणमूल काँग्रेसनेही सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.